लातूर, 09 फेब्रुवारी (हिं.स.)।
औसा पंचायत समितीच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच भारतीय जनता पक्षाने स्पष्ट बहुमत मिळवत सत्ता स्थापन करण्याचा मार्ग मोकळा केला आहे. 18 जागांपैकी भाजपने 11 जागा जिंकल्या असून भाजप विचारधारेचा 1 अपक्ष उमेदवारही विजयी झाला आहे. त्यामुळे एकूण 12 जागांसह (66.67 टक्के) निर्विवाद बहुमत प्राप्त झाले आहे.
या विजयामुळे पहिल्यांदाच औसा पंचायत समितीचा सभापती भाजपचा कार्यकर्ता होणार आहे. भारतीय जनता पार्टी-शिवसेना-रिपाइं युतीच्या सर्व विजयी उमेदवार, पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले आहे.
तसेच भाजपवर विश्वास व्यक्त करणाऱ्या औसा तालुक्यातील मतदारांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले आहेत.
—————
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis
