पुणे, 11 नोव्हेंबर (हिं.स.) मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यावरून राज्यात वाद सुरु असताना त्यात राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांमध्येही मतभेद निर्माण झाले आहेत. त्यावर अजित पवार गटाचे मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली.मंत्री भुजबळ यांनी त्यांची भूमिका मांडली आहे. या मुद्द्यावर टोकाचं कुणीही बोलू नये असं वाटतं. मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे. परंतु, अन्य समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू नये. राज्य सरकार सुद्धा त्याच मार्गाने प्रयत्न करत आहे, असे वळसे पाटील यांनी सांगितले.पुण्यात रयत शिक्षण संस्थेची बैठक आयोजित केली होती. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
हिंदुस्थान समाचार
