डॉ. राणी बंग आणि डॉ. अभय बंग यांनी सामाजिक व वैद्यकीय क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी त्यांना सन २०२४ चा ‘यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार’ जाहीर झाला आहे. हा पुरस्कार यशवंतराव चव्हाण सेंटरतर्फे दरवर्षी राष्ट्रीय एकात्मता, लोकशाही मूल्ये आणि सामाजिक-आर्थिक क्षेत्रातील योगदानासाठी दिला जातो.
BulletsIn
- पुरस्कार विजेते – डॉ. राणी बंग आणि डॉ. अभय बंग
- पुरस्काराचे स्वरूप – पाच लाख रुपये व सन्मानपत्र
- पुरस्कार देणारी संस्था – यशवंतराव चव्हाण सेंटर
- पुरस्काराचा उद्देश – राष्ट्रीय एकात्मता, लोकशाही मूल्ये आणि सामाजिक-आर्थिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याला गौरविणे
- पुरस्काराची स्थापना – यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सुरू
- पुरस्कार वितरण सोहळा – १२ मार्च २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता
- स्थळ – चव्हाण सेंटर, मुंबई
- मुख्य अतिथी – सेंटरचे अध्यक्ष मा. शरद पवार यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान
- डॉ. राणी आणि डॉ. अभय बंग यांचे योगदान – आदिवासी जनतेच्या आरोग्य व सामाजिक सुधारण्यासाठी महत्त्वपूर्ण कार्य
- यशवंतराव चव्हाण यांची जयंती – ११२वी जयंती निमित्ताने पुरस्कार प्रदान केला जाणार
