नाशिक, ०१ फेब्रवारी : ज्या कोणाला देशातील राजकीय आणि सामाजिक परिस्थिती सुधारावी असे वाटत असेल त्याचे महाविकास आघाडीमध्ये स्वागत आहे उद्या देशासाठी कोणी एकत्र येत असेल तर अमेरिकेचे स्वागतच करू असे प्रतिपादन शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नाशिकमध्ये केले.
एका विवाह सोहळ्यासाठी खासदार संजय राऊत हे नाशिक मध्ये आले होते त्यानंतर ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले की केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जो अर्थसंकल्प सादर केला आहे तो केवळ एक देखावा आहे त्यातून काय साध्य होणार आहे हे त्यांना तरी माहिती आहे का असा प्रश्न उपस्थित करून राऊत म्हणाले की भाजपाने देशाचे वाटोळे करणे चालविले आहे त्यामुळे संपूर्ण देश हा एका पारतंत्र्यात चालण्याची टीका त्यांनी व्यक्त केली
प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीला दिलेल्या पाठिंबा वरती त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे स्वागत करतमनसे अध्यक्ष राज ठाकरे जर महाविकास आघाडीत सहभागी झाले तर त्यांचे स्वागत कराल का असा प्रश्न उपस्थित केला असता त्यावर खासदार संजय राऊत म्हणाले की देशाच्या आणि समाजाच्या विकासासाठी जो कोणी महाविकास आघाडीमध्ये येईल त्याचे आम्ही स्वागत करू आणि त्यापासून जर महाविकास आघाडी अधिक बळकट होणार असेल तर त्याचा आनंदच आहे असे सांगून अप्रत्यक्षरीत्या संजय रावते यांनी राज ठाकरे यांना महाविकास आघाडीमध्ये सहभागी होण्याचे अप्रत्यक्षरीत्या आमंत्रण दिले.
