भंडारा, ४ मे – वाढते तापमान लक्षात घेता भंडारा जिल्हा सामान्य रूग्णालयात उपाययोजनेच्या दृष्टीने सुसज्ज उष्माघात कक्ष सुरू करण्यात आले. परंतु, आजतागायत एकही रुग्ण उपचारासाठी या कक्षात भरती झालेला नाही. एअर कंडीशन (वातानुकूलित) सुविधेसह 8 खाटांचे सुसज्ज कक्ष स्थापित करण्यात आले आहे. दरम्यान उष्माघाताचा तडाखा बसलेली येथे अद्याप आलेली नाही.
दरम्यान मे महिना बाकी असून येत्या काळासाठी रूग्णालय सज्ज आहे. कडाक्याच्या उन्हामुळे लोक दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे टाळत आहेत. त्यामुळेच या दिवसांत दुपारच्या वेळी शहरातील रस्ते जणू निर्मनुष्य होत आहेत. दरम्यान प्रत्येक जण आपली काळजी घेत उन्हापासून बचाव करीत असल्याने सध्या उष्माघाताचा त्रास झालेल्याची नोंद सध्या शासकीय रूग्णालयात नाही.
भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात कोरोना ब्लॉक या नवीन इमारतीत उष्माघात कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या इमारतीतील प्रभाग क्रमांक 9 आणि 13 मध्ये प्रत्येकी 4 खाटांचा उष्माघात कक्ष सुरू करण्यात आले आहे. यातील एक महिलांसाठी आणि दुसरा पुरुषांसाठी आहे. बेडच्या व्यवस्थेबरोबरच येथे करण्यात आली आहे.
