ठाणे, ठाणे जिल्हा धनगर समाज उन्नती मंडळाच्यावतीने धनगर ज्ञाती 28 वा वधू-वर परिचय मेळावा रविवार 17 मार्च 2023 रोजी एन.के.टी. हॉल, खारकर, ठाणे येथे सायंकाळी 4 ते 7 या वेळेत पार पडणार आहे. या कार्यक्रमाचा समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे.
ठाणे जिल्ह्यातील धनगर समाजाचा शैक्षणिक, सामाजिक विकास आणि संघटनासाठी कार्यरत असलेल्या ठाणे जिल्हा धनगर समाज उन्नती मंडळाच्यावतीने यंदाही रविवार 17 मार्च 2024 रोजी 28 वा वधू-वर परिचय मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवा सदस्य अॅड. आण्णाराव पाटील, धनगर समाज संघर्ष समितीचे अध्यक्ष तथा मा. खासदार विका महात्मे, खनिकर्म महानिर्मिती कार्यकारी संचालक धनंजय सावळकर यां प्रमुख मान्यवरांसह मा. नगरसेवक योगेश जानकर, समाजसेवक जयसिंग शेंडगे, बाळासाहेब किसवे, विशाखा खताळ, शंकर कोळेकर, बाबासाहेब दगडे उपस्थित राहणार आहेत.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते संजय वाघमोडे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक केशव शिंगाडे, मा. सहा. आयुक्त प्रेरणा महानवर आदींचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे.
कार्यक्रमासाठी अध्यक्ष अरुण गावडे, कार्याध्यक्ष अॅड. नानासाहेब मोटे, खजिनदार रमेश तोंडे, चिटणीस सुनिल राहिंज, वधु-वर मंडळाचे संचालक सुरेश पिंगळे, नंदीनी मोटे, बाळकृष्ण लवटे आदींचे विशेष सहकार्य लाभत असून वधु-वर इच्छुकांनी कार्यक्रमस्थळी दुपारी 4 ते 8 वाजता नावनोंदणी करावी, असे आवाहन संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी सुरेश पिंगळे (9004894212) व बाळकृष्ण लवटे (9967591955) यांच्याशी संपर्क साधावा.
