पुणे: रोजगारनिर्मितीकडे सरकारनं लक्ष दिल्याने त्यांचे आभार मानतो. राज्यात रोजगार निर्माण करण्याची गरज आहे. राजकारण बाजुला राहिलं. पण, मुख्यमंत्री आणि त्यांच्या सहकाऱ्यांना या मुद्द्यावर आमची साथ राहील, असं शरद पवार म्हणाले आहेत.बारामती येथे विद्या प्रतिष्ठानच्या संस्थेत नमो महारोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. त्यावेळी ते बोलत होते’
राज्याची रोजगार निर्मिती करण्याची क्षमता आहे. या मुद्द्यावर आमची सरकारला साथ असेल. असे शरद पवार म्हणाले.मुख्यमंत्री आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे विद्या प्रतिष्ठानच्या वतीने स्वागत करताना मला आनंद होत आहे. ही संस्था १९७१ साली स्थापन झाली, आज ३० हजारपेक्षा जास्त विद्यार्थी या संस्थेत शिकतात. रोजगाराच्या संबंधित हा कार्यक्रम आहे. राज्य सरकारांना मी धन्यवाद देऊ इच्छितो की, आज रोजगार निर्माण करण्याची गरज आहे आणि राज्य सरकार ते काम करत आहे, असं शरद पवार म्हणाले.
गेल्या पाच वर्षांमध्ये या संस्थेतून जी मुलं बाहेर पडली त्या इंजिनियरच्या १५०० मुलांना नोकरी मिळाली आहे. १ लाखांपेक्षा जास्त मुलींना नोकरी मिळाली आहे. अनेक कंपन्यांमध्ये या संस्थेतील मुलं काम करत आहेत. संस्थेमध्ये नोकरी मिळवून देण्यासाठी वेगळा विभाग सुरु केला आहे. तसेच जगातील पाऊलं ओळखून एआयचा देखील आम्ही वापर सुरु करणार आहोत, असं ते म्हणाले.
