ठाणे, २८ जानेवारी, ठाणे रेल्वे स्टेशन परिसरात धर्मवीर लॉटरी विक्रेता सेवा संस्थेच्या वतीने अंध- अपंग व्यक्तींना जीवनावश्यक वस्तुंचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे आमदार निरंजन डावखरे, डॉ. गोरक्षनाथ शिंदे सर, शब्दमुद्राचे संपादक प्रफुल वाघोले, अॅड. धनंजय सिंह यांच्या हस्ते दिव्यांगांना साहित्य वाटप केले. यावेळी संस्थेचे सल्लागार संस्थापक शामसुंदर राणे, अध्यक्ष दिनेश पुजारा, विलास पुजारा, रविंद्र शर्मा, भुपत गणात्रा . सतीष कुदळे, संतोष राणे, मंगेश राणे, अमित गुजर, शिवाजी कोळी, अक्षय कोळी आदी उपस्थित होते.
