सोलापूर 20 ऑक्टोबर : नागपूर येथे धम्मचक्र प्रवर्तन दिवस- 2023 दरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वे सोलापुर विभाग, सोलापूर ते नागपूर आणि नागपुर- पुणे या एकेरी विशेष गाड्या विशेष शुल्कावर चालवणार आहे. तपशील खालीलप्रमाणे-1. गाड़ी क्र.01 029 सोलापूर – नागपूर वन वे स्पेशल सुपरफास्ट एक्सप्रेस दिनांक 24.10.2022 रोजी सोलापूरहून 20.20 वाजता निघेल आणि नागपूरला दुसऱ्या दिवशी 13.05 वाजता पोहोचेल.
थांबे: कुरुडवाडी, दौंड, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा.
रचना : 22 जनरल , सेकंड क्लास दोन लगेज कम गार्डच्या ब्रेक व्हॅनसह (एकूण = 24 ICF कोच). 2.
गाड़ी क्र. 01030 नागपूर-पुणे वन वे स्पेशल सुपरफास्ट एक्सप्रेस गाडी* दिनांक 24.10.2022 रोजी नागपूरहून 23.00 वाजता सुटेल आणि पुण्याला दुसऱ्या दिवशी 17.45 वाजता पोहोचेल.
थांबे : अजनी, सिंदी, सेवाग्राम, वर्धा, पुलगाव, धामणगाव, चांदूर, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, नांदुरा, मलकापूर, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर आणि दौंड चोर मार्ग.
रचना : एक एसी- 2-टायर, दोन एसी 3-टायर, 13 स्लीपर क्लास, 6 जनरल, सेकंड क्लास दोन लगेज कम गार्डच्या ब्रेक व्हॅनसह (एकूण = 24 ICF कोच). प्रवाशांनी कृपया नोंद घ्यावी आणि सुविधेचा लाभ घ्यावा ही विनंती.
