अमरावती, 8 फेब्रुवारी, : जिल्हा स्तरीय शालेय क्रिडा व सांस्कृतिक महोत्सव येथील विभागीय क्रीडा संकुलाच्या पटांगणात सुरू आहे. दरम्यान सांस्कृतीक कार्यक्रमामध्ये एकांकिका, नाटिका, भावगीत, लोकगीत, सिनेगीत, समुह गीत, एकल गीत, अभिनय, हास्य जत्रा, निदर्शने असे बहारदार कार्यक्रम सादर करण्यात आले. यानिमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रमांव्दारे शालेय विद्यार्थी अभिजात कलेचा आविष्कार करीत आहे.
या शालेय सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता मोहापात्रा यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी प्रमुख अतिथी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी,जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी चंद्रशेखर खंडारे,सह अनेक मान्यवर व्यासपिठावर उपस्थित होते.
दरम्यान सांस्कतिक कार्यक्रमामध्ये मोर्शी,नांदगाव खंडे,चांदुर रेल्वे,चांदुर बाजार,दर्यापूर,अंजनगाव सूर्जी,धामणगाव रेल्वे,अमरावती,वरुड,तिवसा,चिखलदरा,भातकुली,धारणी,अचलपूर या पंचायत समितीमधील विद्यार्थ्यांनी आपला कलेचा आविष्कार सादर केला.या कार्यक्रमाचे संचालन शेख शकील,वनिता बोरेडे,शैलेश दहातोंडे, शीला मसराम यांनी केले.परीक्षक म्हणून प्रा.डॉ.मनोज उज्जैनकर,प्रा.विश्वनाथ निळे व वैभावी गोळे यांनी कर्तव्य बजावले.असे क्रिडा महोत्सवाच्या प्रसिध्दी समितीचे राजेश सावरकर,शकील अहमद,विनायक लकडे यांनी कळविले आहे.
