* ११०२५/ ११०२६ पुणे-भुसावळ एक्स्प्रेसचा विस्तार दि.१३ नोव्हेंबरपासून अमरावतीपर्यंत दौंड कॉर्ड लाइन मार्गे, अहमदनगर आणि मनमाड मार्गे वळवून
मुंबई, १२ नोव्हेंबर (हिं.स.) : रेल्वे मंत्रालयाने ११०२५/ ११०२६ पुणे – भुसावळ एक्स्प्रेस दि. १३.११.२०२३ पासून दौंड कॉर्ड लाइन मार्गे, अहमदनगर आणि मनमाड मार्गे अमरावती पर्यंत वाढवली आहे. आणि ११०११/ ११०१२ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – धुळे एक्स्प्रेस ही नवीन ट्रेन देखील सुरू करीत आहे.
ए. ११०२५/ ११०२६ पुणे – अमरावती दैनिक एक्सप्रेस
गाडी क्र. ११०२५ पुणे – अमरावती एक्स्प्रेस दि. १३.११.२०२३ पासून पुणे येथून ११.०५ वाजता सुटेल आणि अमरावती येथे दुसऱ्या दिवशी ००.५५ वाजता पोहोचेल.
गाडी क्र. ११०२६ अमरावती – पुणे एक्स्प्रेस दि. १३.११.२०२३ पासून अमरावती येथून २२.५० वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी ११.२५ वाजता पोहोचेल.
थांबे : उरुळी, दौंड कॉर्ड लाइन, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, चाळीसगाव, कजगाव, पाचोरा, जळगाव, भुसावळ, बोदवड, मलकापूर, नांदुरा, शेगाव, अकोला, बडनेरा.
संरचना : १७ डब्बे – एक वातानुकूलित चेअर कार, एक शयनयान, १३ साधारण (नॉन एसी) चेअर कार ज्यापैकी ७ आरक्षित आणि ६ अनारक्षित, २ सामान्य द्वितीय श्रेणीसह ब्रेक व्हॅन आणि एक जनरेटर कार
११०२५/११०२६ पुणे- अमरावती एक्स्प्रेसच्या वळण आणि विस्तारासह, ट्रेन क्र. ०११०१/०११०२ पुणे – अमरावती – पुणे विशेष पुणे येथून आणि अमरावती येथूनची सेवा दि. १३.११.२०२३ पासून रद्द केली जाईल.
बी. ११०११/११०१२ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – धुळे दैनिक एक्सप्रेस
गाडी क्र. ११०११ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – धुळे एक्स्प्रेस दि. १२.११.२०२३ पासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून १२.०० वाजता सुटेल आणि धुळे येथे त्याच दिवशी २०.५५ वाजता पोहोचेल.
गाडी क्र. ११०१२ धुळे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस दि. १२.११.२०२३ पासून धुळे येथून ६.३० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे त्याच दिवशी १४.१५ वाजता पोहोचेल.
थांबे : दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, निफाड, लासलगाव, मनमाड जंक्शन, नांदगाव, चाळीसगाव, जामधा, शिरूड.
संरचना : १६ डब्बे – एक वातानुकूलित चेअर कार, १३ साधारण (नॉन एसी) चेअर कार (५ आरक्षित आणि ८ अनारक्षित), १ साधारण द्वितीय श्रेणीसह ब्रेक व्हॅन आणि एक जनरेटर कार.
दि.१२.११.२०२३ पासून ११०११/११०१२ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – धुळे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस विशेष ट्रेन, ०१०६५/०१०६६ दादर – धुळे – दादर विशेष आणि ०२१०१/०२१०२ दादर – मनमाड – दादर विशेष ट्रेन दि. १२.११.२०२३ पासून बंद केल्या जातील.
आरक्षण : ११०२५/ ११०२६ पुणे – अमरावती दैनिक एक्सप्रेस आणि ११०११/ ११०१२ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – धुळे दैनिक एक्सप्रेससाठीचे बुकिंग आधीच सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू आहे. तपशीलवार वेळ आणि थांब्यांसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस
(NTES) ॲप डाउनलोड करा.
हिंदुस्थान समाचार
