cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > Regional > साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळांतर्गत नाविन्यपूर्ण योजना कार्यान्वित
Regional

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळांतर्गत नाविन्यपूर्ण योजना कार्यान्वित

CliQ INDIA
Last updated: December 30, 2023 3:30 pm
CliQ INDIA
Share
6 Min Read
SHARE

ठाणे, 30 डिसेंबर, (हिं. स) : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाची स्थापना 11 जुलै 1985 रोजी झाली आहे. महामंडळाच्या भागभांडवलात भरघोस वाढ होऊन महामंडळाचे अधिकृत भागभांडवल 1 हजार कोटी झाले आहे. मंजूर भागभांडवलापैकी सन 2022-23 व 2023-24 या दोन आर्थिक वर्षामध्ये प्रत्येक वर्षी 100 कोटी प्रमाणे 200 कोटीची तरतूद करण्यात आलेली आहे. यापैकी शासनाकडून 100 कोटी निधी प्राप्त झाला असून 31 मार्च 2024 पर्यंत उर्वरित 100 कोटी प्राप्त होणार आहे.

महामंडळामार्फत खालील नाविन्यपूर्ण योजना सुरु करण्यात येत आहे-

अ) एन.एस.एफ.डी.सी.योजना :- (राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती विकास महामंडळ नवी दिल्ली) या महामंडळाचे रु.105 कोटी रुपये थकीत असल्यामुळे त्यांच्याकडून निधी मिळणे 2015 पासून बंद होते परंतू सर्व थकित रक्कम भरणा केल्यामुळे मुदत कर्ज प्रकल्प मर्यादा रु.5,00,000/-, महिला समृध्दी योजना प्रकल्प रक्कम रु.4,40,000/-, लघुऋण योजना प्रकल्प रक्कम रु.1,40,000/- या तीन योजनेसाठी 3500 लाभार्थी करिता रु.100 कोटी निधी मागणीचे प्रस्ताव एन.एस.एफ.डी.सी. महामंडळास मान्यतेसाठी सादर केलेले आहे. एक महिन्यामध्ये निधी उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन एन.एस.एफ.डी.सी.महामंडळाने दिलेले आहे.

मातंग समाजाच्या युवक, युवतीसाठी देशांतर्गत शिक्षणासाठी रु.30,00,000/-(तीस लाख मात्र) व परदेशांतर्गत शिक्षणासाठी रु.40,00,000/- (चाळीस लाख मात्र) कर्ज देण्याकरिताचे प्रस्ताव या महामंडळाच्या जिल्हा कार्यालयाकडून मागविलेले असून पात्र असलेल्या प्रस्तावास एन.एस.एफ.डी.सी. च्या निधीमधूनच मंजुरी देवून विद्यार्थ्यास शैक्षणिक कर्ज योजनेंतर्गत निधी उपलब्ध करुन दिला जाणार आहे.

1. थेट कर्ज योजना – प्रकल्प मर्यादा रु.1,00,000/- (एक लाख) या योजनेंतर्गत सन 2022-23 या आर्थिक वर्षात 1207 लाभार्थ्यांना 12 कोटीचे कर्ज मंजूर केले असून नोव्हेंबर अखेर 800 लाभार्थ्यांना रु.8.00 कोटी रुपयाचे वाटप केलेले आहे. तसेच 2023-24 या आर्थिक वर्षामध्ये भौतिक 1650 व आर्थिक वर्षामध्ये भौतिक 1 हजार 650 व आर्थिक 16.50 कोटी ची तरतूद केलेली असून कर्ज मंजूरीची कार्यवाही चालू आहे.

2. बीजभांडवल योजना – या योजनेची प्रकल्प मर्यादा रु.7,00,000/- (रु.सात लाख) असून यामध्ये महामंडळामार्फत रु.10,000/- अनुदानासहित 20% रक्कम हिस्सा महामंडळामार्फत दिला जात होता परंतु लहुजी साळवे आयोग अभ्यास गटाच्या 19 मंजूर शिफारशीपैकी क्र.01 च्या शिफारशीच्या अनुषंगाने या योजनेमध्ये महामंडळाचा हिस्सा 20% वरुन 45% करण्यात आला आहे. ही रक्कम ४% व्याजाने दिली जाते, लाभार्थीचा सहभाग 5% असून उर्वरीत 50% बँकेचे कर्ज असते. महामंडळाच्या हिश्याचे रक्कम 20% वरुन वाढवून 45% केल्यामुळे बँकाकडून कर्जमंजूरीकरिता वाढता प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे बहुसंख्य अर्जदारांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महामंडळामार्फत करण्यात येत आहे.

3. शिष्यवृत्ती योजना – मातंग समाजातील विद्यार्थ्यांकरिता लोकशाहीर अण्णा भाऊ साठे प्रोत्साहनपर शिष्यवृत्ती योजना राबविली जाते. त्यामध्ये प्रतिवर्षी 10 वी,12 वी, व पदवी मध्ये 60% पेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना 10 वी साठी 1000/-, 12 वी साठी रु.1500/- व संचालक मंडळाच्या मान्यतेने चालू आर्थिक वर्षापासून यामध्ये भरघोस वाढ करण्यात आली असून 10 वी साठी रु.5000/-, 12 वी साठी रु.7500/- व पदवी व पदवीकासाठी रु.10,000/- पदव्युत्तर साठी रु.12,500/-इतकी वाढ करण्यात आली असून आगामी संचालन मंडळाच्या बैठकीत पुन्हा या रक्कमेमध्ये दुप्पट वाढ करण्याचा प्रस्ताव संचालक मंडळास सादर करण्यात येणार आहे.

4. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या धर्तीवर रु.30,00,000/-(रु.तीस लाख) प्रकल्प मर्यादा असलेल्या व व्याज परतावा योजना या महामंडळास लागू करण्याबाबत शासनाकडे प्रस्ताव मान्यतेसाठी सादर करण्यात येत आहे.

5. थेट कर्ज योजना – सध्या महामंडळामार्फत रु.1,00,000/- (एक लाख मात्र) प्रकल्प मर्यादा असलेली थेट योजना राबविण्यात येते परंतु या रक्कमेमध्ये मोठे व्यवसाय करणे शक्य होत नसल्यामुळे योजनेची प्रकल्प मर्यादा रु.5,00,000/- (रु.पाच लाख मात्र) पर्यंत करण्याकरिता समाजाकडून वारंवार मागणी होत होती, त्या अनुषंगाने या योजनेची प्रकल्प मर्यादा रु.5,00,000/- (रु.पाच लाख मात्र) पर्यंत वाढविण्याचा प्रस्ताव शासनास सादर केलेला असून राज्यशासनाकडून याबाबतची मान्यता लवकरच मिळणार आहे.

6. लहुजी साळवे मातंग समाज आयोगाच्या शासनाने मंजूर केलेल्या 68 शिफारशीपैकी 19 शिफारशी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या संबंधित आहे. या 19 असलेल्या शिफारशीमध्ये दोन टप्पे करुन पहिल्या टप्प्यातील नऊ शिफारशीकरिता 234 कोटी व उर्वरीत 10 शिफारशीकरिता रु.221 कोटी असे एकूण रु.455 कोटी इतका निधी मिळण्याकरिताचा प्रस्ताव शासनास सादर केलेला असून प्रस्ताव शासनस्तरावर विचाराधीन आहे.

7. अंधेरी मुंबई तसेच तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद येथील जागेबाबत- मुंबई-अंधेरी येथे 387 चौ.मी. महामंडळाच्या मालकीची जागा असून या जागेवर अण्ण्णाभाऊ साठे भवन व बहुउद्देशीय प्रशासकीय इमारत उभारण्याकरिता रु.50 कोटी तसेच जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांनी मातंग समाजाच्या युवक,युवतीसाठी विविध व्यवसायाचे प्रशिक्षण देण्याकरिता नगरपालिका, तुळजापूर यांच्या मालकीची 1 एकर जागा या महामंडळास उपलब्ध करुन दिली असून या जागेवर सुसज्ज प्रशिक्षण केंद्र उभारणीकरिता रु.50 कोटी निधी मिळण्याकरिताचा प्रस्ताव शासनास सादर केलेला आहे.

8. जाचक अटी शिथील करण्याचा प्रस्ताव- महामंडळामार्फत विविध कर्ज योजना राबविण्यात येतात कर्जाचे वितरण करताना दोन सक्षम जामीनदार शासन निर्णयात नमूद केल्यानुसार घेण्यात येतात जामीनदार घेण्याकरिताची अट शिथील करण्याकरीता समाजातील कार्यकर्ते, सामाजिक संघटक व समाजबांधवाकडून निवेदने प्राप्त झालेली आहेत. त्यानुषंगाने संबंधित अट शिथील करण्यासंदर्भातील प्रस्ताव शासनास सादर केलेला आहे.

तरी गरजू लाभार्थ्यांनी साहित्यरत्न लोकशाहीर अणा भाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) यांच्याकडून राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन ठाणे जिल्हा व्यवस्थापक वंदना राणे यांनी केले आहे.

हिंदुस्थान समाचार

You Might Also Like

कर्करोगाची लक्षणे असलेल्या महिलांचा शोध घेण्यासाठी घरोघरी सर्वेक्षण करावे – हिंगोली जिल्हाधिकारी | BulletsIn
संजय बनसोडे यांच्या हस्ते ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन
सिंधुदुर्ग : पीक विमा प्रलंबित रक्कम मिळाल्याने शेतकऱ्यांनी मानले आभार
वैतरणा जलवाहिनी दुरूस्तीचे काम, मुंबईत ४-५ जानेवारीला पाणीपुरवठा बंद, कपात
सोलापूरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट मैदान उभारणार

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article नव्या वर्षात करा 'एन्जॉय एन्जॉय'
Next Article धुक्यामुळे रेल्वे वाहतूक प्रभावित
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?