सातारा, 23 जानेवारी (हिं.स.) : येथील सोमवार पेठ येथील सर्जन डॉ.आमोद पेंढारकर यांच्या श्रीराम नर्सिंग होम येथे मुंबई येथील जुवेकर नर्सिंग होमचे संचालक, इ एन टी सर्जन व फोर्टिस हॉस्पिटल आणि बॉम्बे हॉस्पिटलचे सल्लागार डॉ.मिनेश जुवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली श्रवणदोष ओळखण्याबाबतचे विनामूल्य सल्ला व तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
येत्या प्रजासत्ताक दिनी 26 जानेवारी रोजी शुक्रवारी सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत या शिबिराचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये मुलांची स्वतःला तोंडी व्यक्त करण्यास असणारी असमर्थता मोठ्या आवाजांना प्रतिसाद न देणे ,श्रवणयंत्राचा वापर न करणे किंवा त्याचा फायदा न होणे. वाचन, लेखन किंवा कोणत्याही संभाषणात भाग घेण्यास अडचण येणे या श्रवणदोषाबाबत हे श्रवणदोष ओळखून त्याबद्दल श्रवण तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत .या शिबिरात इच्छुकांनी तातडीने आपले नाव नोंदवण्यासाठी श्रीराम नर्सिंग होम ,सोमवार पेठ ,मोती चौक सातारा येथे 9822006428 या फोन क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन डॉ. आमोद पेंढारकर, डॉ. मिनेश जुवेकर यांनी केले आहे.
हिंदुस्थान समाचार
