लातूर, 11 ऑगस्ट (हिं.स.)।
आज सोमवारी काँग्रेस भवन, लातूर येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. लातूर जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष अभय साळुंखे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला आहे.
जिल्हा व शहर काँग्रेस यांच्या संयुक्त विद्यमाने, काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत, काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी वोट चोरी संदर्भात केलेले संपूर्ण भाषण व मार्गदर्शन टीव्हीवर पाहून त्याचे सखोल विश्लेषण करण्यात आले.
या संदर्भात कार्यकर्त्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या तसेच आगामी लढाईसाठी सज्ज राहण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.याप्रसंगी
अभय साळुंके, ॲड.किरण जाधव
जिल्हाध्यक्ष, काँग्रेस कमिटी लातूर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
—————
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis
