पिंपरी, 04 फेब्रुवारी (हिं.स.)पिंपरी-चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या गटनेतेपदी जेष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा गटनेता विरोधी पक्षनेता असणार आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांनी प्रतिष्ठेची केली हाेती. त्यांनी स्वतः उमेदवार ठरविण्यापासून प्रचाराची धुरा सांभाळली. महापालिकेतील कथितभ्रष्टाचारावरुन भाजपच्या स्थानिक नेत्यांना लक्ष्य केले होते. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेसला अपयश आले. या पक्षाचे ३७ नगरसेवक निवडून आले. राष्ट्रवादी काँग्रेस दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. त्यामुळे या पक्षाचा गटनेता विरोधी पक्षनेता असणार आहे.
या पदासाठी माजी विराेधी पक्षनेते भाऊसाहेब भाेईर यांच्यासह प्रभाग क्रमांक २० मधील चारही नगरसेवक निवडून आणणारे पॅनेल प्रमुख संदीप वाघेरे, माजी महापाैर वैशाली घाेडेकर इच्छुक होते. चुकीच्या कामाविराेधात बाेलणारा आणि आक्रमक चेहरा विराेधी पक्षनेते पदासाठी देणार असल्याचे संकेत उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांनी दिले होते. अजित पवार यांचे विमान अपघातात अकाली निधन झाले. त्यामुळे गटनेता नोंदविण्याची प्रक्रिया रखडली होती
—————
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु
