नासिक, १६ जानेवारी (हिं.स.) नाशिक जिल्ह्यामध्ये थंडीचा कडाका वाढला असून तापमान 10 अंश डिग्री सेल्सिअसच्या खाली गेले आहे.
नाशिक जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसांपासून थंडीचा कडाका हा चांगलाच वाढला आहे मंगळवारी नाशिक जिल्ह्यामध्ये तापमानात घसरून झाली असून जिल्ह्यात सर्वात कमी तापमान निफाड तालुक्यामध्ये ६.२ डिग्री सेल्सिअस नोंदविण्यात आली आहे तर नाशिक मध्ये तापमान हे ९.६ डिग्री सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले आहे. थंडीचा कडाका वाढल्यामुळे त्याचा फटका द्राक्ष नगरी असलेल्या निफाड तसेच दिंडोरी आणि नाशिक तालुक्याला बसणार असून या ठिकाणी द्राक्षाचे मनी थंडीमुळे चढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर तापमान १० अंश डिग्री सेल्सिअसच्या खाली आल्यामुळे जन जीवनावर देखील याचा परिणाम दिसून येत आहे.
हिंदुस्थान समाचार
