संत ज्ञानेश्वर माउली परिवाराच्या वतीने दीपोत्सव
लासलगाव, २४ नोव्हेंबर (हिं.स.) – देवउत्थान एकादशीला उठतात भगवान विष्णू, संपतो चातुर्मास अन वाजतो सनई चौघडा..तुळशी होते वधू शालीग्राम स्वरूप वर..पाहता पाहता मंगल…होते सारे त्रिभुवन..या भावनेतून येथील संत ज्ञानेश्वर माऊली मंदिरात देवउत्थान विष्णु प्रबोधिनी कार्तिकी एकादशी निमित्त ११०० पणत्यांची रोषणाई करून दीपोत्सव सोहळा साजरा करण्यात आला.धनसंपदा पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष अविनाश दुसाने यांच्या हस्ते पहिला दिवा प्रज्वलित करून दीपोत्सवाची सुरूवात झाली.
संत ज्ञानेश्वर माउली परिवार तसेच ब्राह्मण महासंघ विश्वस्त तथा मैत्रेयी महिला मंडळ अध्यक्ष स्मिता कुलकर्णी, उपाध्यक्ष स्वाती जोशी, चिटणीस तृप्ती केंगे,हरित सेनेचे ऋषिकेश जोशी,ब्राह्मण महासंघ नाशिक जिल्हा युवाध्यक्ष गणेश जोशी,सामाजिक कार्यकर्ते निलेश जगताप यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
हिंदुस्थान समाचार
