cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > Regional > शिवसेनाप्रमुख जिवंत असते, तर त्यांनी मोदींना शाबासकी दिली असती – मुख्यमंत्री
Regional

शिवसेनाप्रमुख जिवंत असते, तर त्यांनी मोदींना शाबासकी दिली असती – मुख्यमंत्री

CliQ INDIA
Last updated: January 9, 2024 7:30 pm
CliQ INDIA
Share
5 Min Read
SHARE

रत्नागिरी, 9 जानेवारी (हिं.स.) : अयोध्येतील राम मंदिर उभारणे आणि काश्मीरमधील 370 कलम हेटवणे ही स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची दोन्ही स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण केली असून आज बाळासाहेब जिवंत असते तर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली असती, असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. शिवसेनेच्या राज्यव्यापी शिवसंकल्प अभियानाची तिसरी सभा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील राजापूरमध्ये येथे पार पडली. या सभेत बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केले. या सभेला राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, उद्योग मंत्री उदय सामंत यांसह शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

शिवसेनेच्या स्थापनेपासून मुंबई आणि ठाणे हे शिवसेनेचे शरीर असेल कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे दोन जिल्हे हे शिवसेनेची फुफ्फुसे आहेत. या दोन जिल्ह्यातील शिवसैनिकांनी कायमच शिवसेनेला भक्कम साथ दिलेली आहे. त्यामुळेच शिवसेनाप्रमुखांचे कोकणावर विशेष प्रेम होते. कोकणातील माणूस हा फणसासारखा बाहेरून कठोर दिसत असला तरी आतून मऊ असतो मात्र एकदा का त्याने ठरवले की तो समोरच्या विरोधकाचे डिपॉझिट जप्त केल्याशिवाय शांत बसत नाही.

दीड वर्षांपूर्वी आम्ही घेतलेला निर्णय हा वैयक्तिक स्वार्थासाठी घेतला नसून बाळासाहेब ठाकरेंचा विचार जिवंत रहावा यासाठी घेतला असल्याचे सांगितले. विझलेल्या मशालीचा उजेड कधी पडत नाही. सत्तेपेक्षा नाव मोठे असते आणि ते कायम जपायचे असते असे बाळासाहेब नेहमी म्हणत, आम्ही सत्तेसाठी नव्हे तर विचारांसाठी एकत्र आलो आहे. आम्ही केलेले धाडस फक्त महाराष्ट्राने नव्हे तर संपूर्ण जगाने पाहिले आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे आम्ही सारे वारसदार असून त्यांच्या संपत्तीचा आम्हाला मोह नाही, त्यामुळे जेव्हा पक्षाच्या खात्यातील 50 कोटी उबाठा गटाने मागितले तेव्हा क्षणाचाही विलंब न लावता ते काढून दिल्याचे सांगितले.

अयोध्येत राम मंदिर तयार करणे आणि काश्मीरमधील 370 कलम हटवणे ही स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची स्वप्ने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण केली आहेत. मात्र आज त्यांच्या हेतुवर शंका घेतली जात आहे. त्यांच्याबद्दल मंदिर वही बनाएंगे, तारीख नही बतएंगे अशी टीका करण्यात आली पण मोदींनी मंदिरही बांधले आणि 22 जानेवारी ही तारीख देखील जाहीर केली. आता राम मंदिराच्या उद्घाटनाचे आमंत्रण मला मिळाले असून या कार्यक्रमासाठी अयोध्येला जाणार असल्याचे सांगितले.

कोकणाचा सर्वांगीण विकास करून त्याला राज्यात नंबर एकचा विभाग बनविण्यासाठी शासन कटिबद्ध असून, राज्य शासनाने काजू उत्पादकांचे प्रश्न समजून त्याना दिलासा देण्यासाठी काजू बोर्डाची स्थापना केली असल्याचे सांगितले. आंबा बागायतदारांसाठी आंबा बोर्ड करणार असून पीक विमा योजनेत आंबा पिकाचा समावेश करण्यात येईल. रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णे बांदरापाशी उद्योग विभागामार्फत मरीन प्लाझा तयार करण्यात येत आहे. कोकणातील प्रमुख देवस्थानांच्या विकासासाठी निधीही देण्यात येईल असेही शिंदे यांनी यावेळी सांगितले.

तर कोकणातील नद्यांचे वाहून जाणारे पाणी अडवण्यासाठी एमएमआरडीए प्रमाणे कोकण क्षेत्रीय विकास प्राधिकरण स्थापन करून त्यासाठी 500 कोटींची तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. शिवडी न्हावाशेवा दरम्यान तयार करण्यात आलेल्या 22 किलोमीटरचा अटल सेतूमुळे कोकण ते मुंबई अंतर जवळ येणार आहे. समृद्धी महामार्गाप्रमाणे मुंबई- सिंधुदुर्ग- गोवा हा सुपर एक्स्प्रेस एक्सेस कंट्रोल महामार्ग आपण तयार करत असून त्याचा प्रकल्प अहवाल तयार करण्यात येत आहे. त्यासोबतच मुंबई गोवा महामार्गाचे अपूर्ण काम येत्या वर्षभरात नक्की पूर्ण करण्यात येईल असेही यावेळी स्पष्ट केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश जगभरात नावलौकिक कमावत आहे. राज्य सरकारला त्यांनी पूर्ण सहकार्य केले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत परदेशात जाऊन देशाची बदनामी करणारा माणूस पंतप्रधान म्हणून हवा की देशाला सर्वस्व देणारा माणूस पंतप्रधानपदी हवा ते आपल्याला ठरवायचे आहे. त्यामुळे मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी अब की बार, मोदी सरकार, 45 पार हे आपले घोषवाक्य असून त्यासाठी कामाला लागण्याचे आवाहन शिवसैनिकांना केले. आगामी लोकसभा निवडणुकीत 45 हुन अधिक जागा आपल्याला जिंकायच्या असल्याचे सांगत यासाठी महायुतीचे हात बळकट करण्याचे आवाहन सर्वांना केले.

बारसू रिफायनरी विरोधक आणि समर्थकांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

बारसू रिफायनरीला विरोध करणारे विरोधक आणि हा प्रकल्प कोकणातच करावा अशी मागणी करणारे समर्थक आशा दोन्ही गटांनी आज राजापूर दौऱ्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी या प्रकल्पाला विरोध करणाऱ्या गटाच्या शिष्टमंडळाचे म्हणणं जाणून घेतले तसेच या विषयावर मंत्रालयात सविस्तर बैठक घेण्याचे देखील मान्य केले. तसेच आंदोलन करताना त्यांच्यावर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत तसेच त्यांचे इतर विषय सोडवावेत अशी मागणी केली. तर बारसू रिफायनरी समर्थकांनी हा प्रकल्प कोकणातून बाहेर नेला जाऊ नये, अशी मागणी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली.

हिंदुस्थान समाचार

You Might Also Like

ज्ञाती कुलसंमेलने म्हणजे कुटुंबाचीच विस्तारीत संकल्पना – ज्येष्ठ हास्य-व्यंगचित्रकार शि. द. फडणीस
गेल्या 23 वर्षातील कामगिरी : पॉज संस्थेने वाचवले 4000 च्या वर वन्यजीव
सखी वन स्टॉप सेंटर मध्ये पाच वर्षात 806 महिला, मुलींना मिळाला निवारा | BulletsIn
शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि उत्तरदायी करण्यासाठी सरकार कटिबद्ध – प्रताप सरनाईक
मुंबईतील नाल्यातून पावसाळापूर्व गाळ काढण्याचे ४७.६० टक्के काम पूर्ण

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article क्लब महिंद्राने आग्नेय आशियातील स्थान केले अधिक बळकट
Next Article ईडीच्या आरोपपत्रात राबडीदेवींसह मुलींची नावे
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?