मुंबई, 09 जानेवारी (हिं.स.) : शिवसेना (उबाठा) गटाचे खासदार राजन विचारेंकडे आज, मंगळवारी इन्कम टॅक्सची धाड पडली आहे. ठाणे परिसरातील विचारेंचे पिढीजात घर आणि हिरानंदानी येथील निवास अशा दोन्ही ठिकाणी सकाळपासून इन्कम टॅक्सचा अधिकाऱ्यांनी कारवाई सुरू केलीय.
शिवसेना उद्धव ठाकरे गटाला आजचा दिवस धक्का देणारा ठरला आहे. जोगेश्वरी भूखंड गैरवापर प्रकरणी ईडीने उबाठा गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या 7 ठिकाणांवर छापेमारी केली. त्याचवेळी खासदार राजन विचारेंच्या घरांवर आयकर विभागाने छापा टाकला आहे. ठाकरे गटाचे खासदार राजन विचारेंच्या घरावर आयकर विभागाचा छापा टाकण्यात आलाय. खासदार विचारे यांच्याशी संबंधित काही व्यवसायिकांना चौकशीसाठी बोलण्यात आले आहे. तसेच काही कार्यालयांवर देखील छापेमारी करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. राजन विचारे सध्या ठाण्यातील हिरानंदानी परिसरात राहतात. ठाण्यातील अन्य एका घरावर देखील धाड टाकण्यात आली आहे. विचारेंच्या जुन्या घरामसोर असलेल्या कार्यलयावर देखील आयकर विभागाकडून छापेमारी करण्यात आली आहे.
हिंदुस्थान समाचार
