मुंबई, ३ जानेवारी (हिं.स.) : साहित्यिक व कवी डाॅ. शीतल नायर यांनी श्रीराम आणि सीता मातेवर कविता रचली होती. त्याची दखल अमेरिकन साहित्य संस्थेने घेतली. या उत्तम प्रस्तुतीसाठी पोएट्री एसोसिएशन ऑफ अमेरिकाद्वारे मान्यताप्राप्त एमिली डिकिंसन पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. एमिली डिकिंसन हा पुरस्कार २००३ पासून पोएट्री एसोसिएशन ऑफ अमेरिकाद्वारे सुरू करण्यात आला आहे.
लेखक व कवी डॉ. शीतल नायर यांनी म्हटले की, मी आत्तापर्यंत वेगवेगळ्या विषयांवर 6 पुस्तके लिहीली आहेत व हे माझे सातवे पुस्तक आहे. फ़्लेम्स ऑफ़ डिज़ायर नावाने रचल्या गेलेल्या 21 कवितांच्या ह्या कवितासंग्रहामध्ये श्रीराम आणि सीता मातेमधील प्रेमाबद्दल दिव्य प्रेम ह्या शीर्षकासह कविता रचली गेली आहे. ही कविता सॉनेट प्रकारात रचली गेली आहे. ह्या प्रकारची कविता सध्या अगदी थोडेच कवी रचत आहेत. कवितेला पोएट्री एसोसिएशन ऑफ अमेरिका द्वारे मान्यता दिली गेली आहे व मला एमिली डिकिंसन पुरस्काराने सन्मानित केले गेले आहे. हा पुरस्कार अमेरिकन साहित्य क्षेत्रातील मुख्य पुरस्कार आहे. हा पुरस्कार अमेरिकन कवयित्री एमिली डिकिंसन ह्यांच्या सन्मानार्थ २००३ पासून दिला जातो. हा पुरस्कार मिळवणारी गुजरातमधील मी पहिली कवयित्री आहे. २२ जानेवारीला जेव्हा राम मंदिराचे उद्घाटन होईल, तेव्हा असे म्हणता येईल की ह्या कवितेद्वारे जय श्री रामचा नाद अमेरिकेमध्येही घुमणार आहे. उल्लेखनीय आहे की, डाॅ. शीतल नायर ह्यांनी लिहीलेले पुस्तक फ्लेम्स ऑफ डिज़ायर एक अमेझॉन बेस्टसेलर पुस्तक आहे.
हिंदुस्थान समाचार
