नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर (हिं.स.) महाराष्ट्र सदन येथे आज ‘संविधान दिन’ साजरा करण्यात आला. कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात राज्य घटनेच्या उद्देशिकेचे सामुहिकपणे वाचन करण्यात आले.
यावेळी निवासी आयुक्त तथा प्रधान सचिव रुपिंदर सिंग , सहायक निवासी आयुक्त डॉ.राजेश अडपावर यांच्यासह महाराष्ट्र सदनातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
हिंदुस्थान समाचार
