cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > National > ममता बॅनर्जी यांच्यावर आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप; भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार
National

ममता बॅनर्जी यांच्यावर आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप; भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार

CliQ INDIA
Last updated: March 31, 2026 6:35 am
CliQ INDIA
Share
3 Min Read
SHARE
ममता बॅनर्जी

कोलकाता, ३० मार्च (हिं.स.): भारतीय जनता पक्षाने (भाजप) पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेसच्या काही नेत्यांविरोधात आचारसंहितेच्या कथित उल्लंघनाबद्दल निवडणूक आयोगाकडे औपचारिक तक्रार दाखल केली आहे. पक्षाचा आरोप आहे की, निवडणूक सभांदरम्यान केलेल्या काही वक्तव्यांमधून लोकांना घाबरवण्याचा, चिथावणी देण्याचा आणि निवडणूक प्रक्रियेवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला.

भाजपने सोमवारी पाठवलेल्या एका पत्रात म्हटले आहे की, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी उत्तर बंगालसह विविध निवडणूक सभांमध्ये केलेल्या भाषणांमध्ये अशी वक्तव्ये होती, जी मतदारांवर प्रभाव टाकू शकतात आणि तणाव निर्माण करू शकतात, ज्यामुळे मुक्त आणि निष्पक्ष निवडणुकांना धोका निर्माण होऊ शकतो.भाजपने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, २५ मार्च २०२६ रोजी मैनागुरी येथील एका सभेत मुख्यमंत्री म्हणाल्या होत्या की, निवडणुकांनंतर लोकांना त्यांच्या घराबाहेर लिहावे लागेल की ते भाजपला पाठिंबा देत नाहीत. भाजपने या वक्तव्याला राजकीय अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी म्हटले आहे.

या तक्रारीत त्याच दिवशी नक्षलबाडी येथील एका सभेत महिलांना घरात जे काही आहे ते बाहेर काढा असे केलेल्या आवाहनाचाही उल्लेख आहे. अशा वक्तव्यांमुळे संघर्ष निर्माण होऊ शकतो, असा भाजपचा आरोप आहे. गेल्या २६ मार्च रोजी पांडवेश्वर येथील सभेत मुख्यमंत्र्यांनी लोकांना मतदान आणि मतमोजणीच्या दिवशी एकजूट होऊन आंदोलन करण्याचे आणि सतर्क राहण्याचे केलेल्या आवाहनाचा संदर्भ देत, भाजपने म्हटले आहे की, यातून निवडणूक प्रक्रियेच्या निष्पक्षतेवर शंका निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

या तक्रारीत दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील बसंती भागातील एका घटनेचाही उल्लेख आहे, ज्यात भाजप कार्यकर्त्यांवर कथितरित्या हल्ला झाला होता. अशा वक्तव्यांमुळे निर्माण झालेल्या वातावरणाचा परिणाम म्हणून ही घटना घडली असावी, असा भाजपचा दावा असून, राज्य पोलिसांवर निष्क्रियतेचा आरोपही करण्यात आला आहे.भाजपने २८ मार्च रोजी कोलकाता येथे तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी केलेल्या एका वक्तव्याचाही उल्लेख केला आहे, ज्यात कथितरित्या प्रादेशिक तुलना करण्यात आली होती. अशा वक्तव्यांमुळे समाजात फूट पडू शकते, असे भाजपचे म्हणणे आहे.आपल्या तक्रारीत, भाजपने निवडणूक आचारसंहिता, लोकप्रतिनिधित्व कायदा, १९५१ आणि भारतीय दंड संहिता, २०२३ च्या विविध कलमांचा हवाला देत कारवाईची मागणी केली आहे. या वक्तव्यांमुळे वेगवेगळ्या समुदायांमधील तणाव वाढू शकतो, जे कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन आहे, असे पक्षाचे म्हणणे आहे.राज्यात मुक्त, निष्पक्ष आणि शांततापूर्ण निवडणुका सुनिश्चित करण्यासाठी निवडणूक आयोगाने या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करावा आणि योग्य कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी भाजपने केली आहे.

—————

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे

You Might Also Like

व्हाइस अ‍ॅडमिरल संजय साधू यांची युद्धनौका उत्पादन आणि अधिग्रहण नियंत्रक म्हणून नियुक्ती
जगातील पहिल्या पाच आरोग्यसेवा उपकरणे उत्पादकांमध्ये भारताचा समावेश – डॉ जितेंद्र सिंह
शिवसेना आमदार अपात्रता : सर्वोच्च न्यायालयाची शिंदे गटातील आमदारांना नोटीस
मणिपूर हिंसाचाराचा सीबीआय तपास करा- आयटीएलएफ
**एअर इंडिया आणि इंडिगोचे इंधन अधिभार वाढले; विमान प्रवासाचा खर्च वाढणार** जागतिक इंधन संकटामुळे विमान वाहतूक क्षेत्रावर परिणाम झाला असून, एअर इंडिया आणि इंडिगो या दोन्ही विमान कंपन्यांनी इंधन अधिभारात वाढ केली आहे. यामुळे विमान प्रवाशांना आता अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article होर्मुज सामुद्रधुनी खुली न केल्यास तेल-वीज प्रकल्प आणि खार्ग बेट उद्ध्वस्त करू – ट्रम्प
Next Article फिडे कॅन्डिडेट्स २०२६: पहिल्या फेरीत आर. प्रज्ञानंदची अनिश गिरीवर मात
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?