‘स्टॅच्यु ऑफ युनिटीत’ जाऊन दिली पुष्पांजली
अहमदाबाद, 31 ऑक्टोबर (हिं.स.) : लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 148 व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना अभिवादन केले. गुजरातमध्ये नर्मदा नदीच्या काठावर असलेल्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ या पटेलांच्या पुतळ्याला पंतप्रधानांनी पुष्पांजली अर्पण केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसीय गुजरात दौऱ्यावर आहेत. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आज, मंगळवारी पंतप्रधान मोदी स्टॅच्यू ऑफ युनिटी येथे राष्ट्रीय एकता दिन सोहळ्यात सहभाग घेतला. त्यांनी स्टॅच्यू ऑफ युनिटी येथे सरदार वल्लभ भाई पटेल यांना श्रद्धांजली अर्पण केली. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान मोदी यांनी मेरा युवा भारत संघटनेचा शुभारंभ केला. सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या जयंती निमित्त पंतप्रधान मोदी यांनी ‘मेरा युवा भारत’ संघटना लाँच केली. पंतप्रधान रविवारी ‘मन की बात’ कार्यक्रमात सांगितले होते की, ‘मेरा युवा भारत’ संघटना भारतातील तरुणांना विविध राष्ट्र उभारणी कार्यक्रमांमध्ये सक्रिय भूमिका बजावण्याची संधी देईल. विकसित भारताच्या उभारणीत भारतातील युवाशक्तीला एकत्रित करण्याचा हा अनोखा प्रयत्न आहे. देशातील तरुणांसाठी ‘मेरा युवा भारत’ हे महत्त्वाचे व्यासपीठ ठरणार आहे.
हिंदुस्थान समाचार
