नवी दिल्ली, 28 डिसेंबर (हिं.स.) : देशात एकीकडे थंडीचा कडाका वाढत असताना दुसरीकडे कोरोना रुग्णांमध्येही वाढ झाली आहे. देशात कोरोनाच्या जेएन-1 व्हेरियंटच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. एका दिवसात जेएन-1 व्हेरियंटचे 100 हून अधिक रुग्ण सापडले आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासांत 529 रुग्णांची वाढ झाली आहे. तर कोरोना व्हायरसच्या नव्या जेएन-1 व्हेरियंटच्या रुग्णांची संख्या 110 वर पोहोचली आहे. राजधानी दिल्ली कोरोनाच्या जेएन-1 व्हेरियंटचा पहिला रुग्ण आढळल्याने खळबळ माजली आहे.
देशात कोरोनाच्या जेएन-1 व्हेरियंटच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. एका दिवसात नवीन जेएन-1 व्हेरियंटचे 100 हून अधिक रुग्ण सापडले आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासांत 529 रुग्णांची वाढ झाली आहे. तर कोरोना व्हायरसच्या नव्या जेएन-1 व्हेरियंटच्या रुग्णांची संख्या 110 वर पोहोचली आहे. राजधानी दिल्ली कोरोनाच्या जेएन-1 व्हेरियंटचा पहिला रुग्ण आढळल्याने खळबळ माजली आहे. दिल्लीमध्ये कोरोनाच्या नव्या जेएन-1 व्हेरियंटच्या पहिल्या रुग्णाची नोंद झाली आहे. यामुळे, देशातील एकूण रुग्णांची संख्या 110 वर पोहोचली आहे. बुधवारी देशात एकूण 529 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. दरम्यान, देशात सध्या कोरोनाचे 4,093 सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. देशात अनेक राज्यांमध्ये कोरोना विषाणूच्या नव्या जेएन-1 व्हेरियंटने डोकेदुखी वाढवली आहे. केरळ, कर्नाटक, गुजरातसह दिल्लीमध्ये नव्या जेएन-1 व्हेरियंटचे रुग्ण आढळले आहेत. देशात नवीन जेएन-1 प्रकाराचे सर्वाधिक रुग्ण गुजरातमध्ये आहेत. 8 डिसेंबरला केरळमध्ये जेएन-1 व्हेरियंटचा पहिला रुग्ण आढळला होता, त्यानंतर आता हा विषाणू अनेक राज्यांमध्ये पसरला आहे.
हिंदुस्थान समाचार
