cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > National > देवेंद्र फडणवीस, बावनकुळे रेशीबाग संघ कार्यालयात
National

देवेंद्र फडणवीस, बावनकुळे रेशीबाग संघ कार्यालयात

CliQ INDIA
Last updated: January 15, 2024 4:30 pm
CliQ INDIA
Share
3 Min Read
SHARE

भाजपा आणि संघाच्या प्रांत कार्यकारिणीची समन्वय बैठक

नागपूर, 15 जानेवारी (हिं.स.) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विदर्भा प्रांताची समन्वय बैठक आज, सोमवारी रेशीमबाग परिसरातील डॉ. हेडगेवार स्मृती मंदिर परिसरात घेण्यात आली. या बैठकीला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संघाच्या विदर्भ प्रांत कार्यकारिणीचे पदाधिकारी सहभागी झाले होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळेंसह ज्येष्ठ भाजप नेते आज, सोमवारी साकाळी 9.30 वाजेच्या सुमाराला रेशीमबागेत पोहचले. याठिकाणी डॉ. हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजींच्या समाधीस्थळाचे दर्शन घेऊन दोन्ही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची महर्षि व्यास सभागृहात बैठक झाली. संघ आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये नियोजन, समन्वय आणि कार्यविस्तारासाठी वेळोवेळी अशा प्रकारच्या बैठकीत होत असते. यापूर्वी 2 जुलै 2023 रोजी भाजप आणि संघाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली होती. यावर्षी लोकसभेची निवडणूक होणार आहे. तसेच राज्याच्या राजकारणात गेल्या 2 वर्षातील राजकीय आणि सामाजिक घडामोडी आणि त्याचा निवडणूक आणि समाजकारणावरील संभाव्य प्रभाव आणि परिणाम यानुषंगाने बैठकीत विशेष मंथन झाल्याची माहिती माहिती ज्येष्ठ भाजप नेत्याने दिली.

राज्याच्या राजकारणातील भाजपचा पारंपारिक सहकारी असलेली शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील फूट पडली. त्यानंतर या दोन्ही पक्षांमधील मोठे गट भाजपसोबत आलेत. त्यामुळे 3 पक्षांचे राजकारण आणि निवडणुकीसाठीचे जागावाटप याबाबत या समन्वय बैठकीत चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. एकीकडे महाविकास आघाडी आणि दुसऱ्या बाजुला तब्बल 14 पक्षांची महायुती अशा दोन ध्रुवीय राजकारणात भाजपला लोकसभा निवडणुकीत अधिकाधिक जागा कशा निवडून आणता येईल. तसेच सामाजिक व राजकीय परिस्थितीतील प्रतिकूलता कमी करण्यासाठी काय करता येईल या मुद्यावरही बैठकीत प्रकाश टाकण्यात आला. नागपुरात महायुतीच्या 14 पक्षांचा मेळावा झाला. यात भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी (अजित पवार गट), पिरिपा, आरपीआय (आठवले), ब.वि.आ., जेएसएस., आरएसपी, पीजेपी, स्वाभिमान, रयत क्रांती संघटना, भीमसेना, बरिएमं, शिवसंग्राम यांचा प्रामुख्याने समावेश होता. इसके सर्व पक्ष आणि मुद्दे घेऊन जागा वाटप कसे करायचे आणि लोकसभेत भाजपला अधिकाधिक लाभ कसा प्राप्त करता येईल हा विषय बैठकीच्या केंद्रस्थानी असल्याचे भाजप नेत्यांनी सांगितले.

दरम्यान या बैठकीसंदर्भात संघाकडून कुठलीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्थापनेपासूनच सत्तेच्या राजकारणापासून लांब राहतो. त्यामुळे जागावाटप, निवडणूक असे विषय संघाच्या एजेंड्यावर नसतात. भाजप वेळोवेळी राजकारणाशी संबंधित नसलेल्या विषयांवर संघाचे मार्गदर्शन घेत असतो. त्याचाच एक भाग म्हणून सामान्य चर्चेसाठी ही बैठक असल्याचे संघाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

हिंदुस्थान समाचार

You Might Also Like

नवी दिल्ली : पार्किंगच्या आगीत चौघांचा होरपळून मृत्यू
शहीद वीरांचे अतुलनीय बलिदान, वचनबद्धता, देशभक्ती ही सुरक्षित आणि समृद्ध भारताचा पाया – राजनाथ सिंग
मच्छिमार समुदाय अर्थव्यवस्थेची मोठी ताकद : मोदी
भुसावळ – महानगरी एक्सप्रेसमध्ये पाकिस्तान जिंदाबाद, आयएसआयचे संदेश
प्रवासी विमानतळावरील विमानातून इमर्जन्सी दरवाजा उघडतो आणि चेन्नई विमानतळावर हालचाल करणाऱ्या विमानातून सुटतो, घबराट आणि सुरक्षा समस्या निर्माण होते

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article जगदज्योती महात्मा बसवेश्वर आणि संत काशीबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाची स्थापना
Next Article उर्दू कवी मुनव्वर राणा यांचे निधन
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?