भोपाळ, 23 जुलै (हिं.स.)। ग्वाल्हेरमधील आग्रा-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर रस्त्याच्या कडेला चालणाऱ्या कावडधारींना एका कारने चिरडले. त्यानंतर कार उलटली. अपघातात तीन कावडधारींचा जागीच मृत्यू झाला, तर एका जखमीचा रुग्णालयात मृत्यू झाला. दोघांची प्रकृती गंभीर आहे. मृतांपैकी तिघे एकाच कुटुंबातील आहेत.
काल, मंगळवारी रात्री १ वाजता राष्ट्रीय महामार्गाच्या शिवपुरी लिंक रोडवरील शीतला माता मंदिर गेटजवळ हा अपघात झाला. अपघातानंतर कावडधारी कारसह रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात पडले. कंपू, जनकगंज, झांसी रोड, माधोगंज पोलिस ठाण्याचे पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि सर्वांना खड्ड्यातून बाहेर काढले आणि जेएएच ट्रॉमा सेंटरमध्ये नेले. डॉक्टरांनी तीन कावडधारींना मृत घोषित केले.
अपर पुलिस अधीक्षक हीना खान म्हणाल्या की, गाडी खूप वेगाने जात होती. यादरम्यान, टायर फुटल्याने ती अचानक नियंत्रणाबाहेर गेली आणि भाविकांना चिरडून महामार्गाखालील झुडपात उलटली. पोलिस पोहोचले तेव्हा गाडीत कोणीही आढळले नाही. गाडीतील लोकांचा शोध घेतला जात आहे.
पुरण बंजारा हे सिदना चक सिमरिया घाटीगाव येथील रहिवासी असून, रमेश बंजारा रा. सिमरिया घाटीगाव, दिनेश बंजारा रा. सिमरिया घाटीगाव तिघे एकाच कुटुंबातील असलायचे समजते तर धर्मेंद्र उर्फ छोटू रा. घाटीगावातील आहे.
सर्व कावडधारी एकाच गावातील मिळालेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी सिमरिया पंचायतीतील बंजारा का पुरा समाजातील एक कुटुंब आणि १३ जण कावड भरण्यासाठी निघाले होते. हे सर्वजण भादवणातील शिव मंदिराच्या धबधब्यातून पाणी घेऊन घाटीगावातील सिमरियाला परतत होते. बुधवारी कावडमध्ये भरलेल्या पाण्याने महादेवाला अभिषेक करायचा होता. अपघात झाला तेव्हा ते नुकतेच शीतला माता मंदिर तिरहा येथे पोहोचले होते. त्यांचे गाव घटनास्थळापासून फक्त ३५ किमी अंतरावर होते.
—————
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule
