नवी दिल्ली, 01 डिसेंबर (हिं.स.) : बँकेशी संबंधित नियमांमध्ये आज, शुक्रवारपासून बदल करण्यात आले आहेत. ग्राहकाने कर्जाची परतफेड केल्यानंतर बँकेला 30 दिवसांच्या आत त्याने गॅरंटी म्हणून जमा केलेली कागदपत्रे परत करावी लागणार आहे.
रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या या नव्या नियमानुसार कर्जदाराने कर्जाची पूर्ण परतफेड केल्यानंतर, ग्राहकाला गॅरंटीच्या बदल्यात ठेवलेली कागदपत्रे 30 दिवसांच्या आत परत करावी लागतील. ही कागदपत्रे वेळेवर परत न केल्यास बँकांना दंड आकारला जाईल. हा दंड प्रतिदिन 5 हजार रुपये या दराने भरावा लागणार आहे.कागदपत्रे हरवल्यास बँकेला अतिरिक्त 30 दिवसांचा वेळ मिळेल. या प्रकरणात, नवीन कागदपत्रे मिळविण्यासाठी बँकेला मदत करावी लागेल आणि त्याचा खर्च देखील करावा लागेल.
हिंदुस्थान समाचार
