चित्रपटात साकारली होती बबीता फोगाटची भूमिका
फरीदाबाद, 17 फेब्रुवारी : अमिर खानच्या दंगल चित्रपटात बबीता फोगाटची भूमिका साकारणारी अभिनेत्री सुहानी भटनागरचे निधन झालेय. फ्रॅक्चरमुळे झालेल्या कॉम्प्लिकेशन्सनंतर तिची प्रकृती खालावत जाऊन अवघ्या 19 व्या वर्षी सुहानीने अखेरचा श्वास घेतला. तिच्या पार्थिवावर आज, शनिवारी फरीदाबाद येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
सुहानीच्या पायाला काही दिवसांपूर्वी फ्रॅक्चर झाले होते. तिच्यावर फरीदाबाद येथील एम्स रुग्णालयात उपचार सुरू होते. परंतु, उपचारादरम्यान औषधांच्या रिएक्शनमुळे तिच्या शरीरात पाणी होऊन शुक्रवारी 16 फेब्रुवारीला तिची प्राणज्योत मालवली. बालवयातच आपल्या अभिनयाने सर्वांची मने जिंकणाऱ्या सुहानीचा अकाली निधनामुळे चित्रपट जगत आणि रसिकांमध्ये शोककळा पसरली आहे.
