2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये भारतीय निवडणूक आयोगाने सर्वसमावेशकता आणि सुगम्यतेसाठी मोठ्या प्रमाणात पावले उचलली आहेत. त्यामुळे कोणताही पात्र मतदार शारीरिक किंवा इतर अडथळ्यांमुळे मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहणार नाही. यामुळे दिव्यांग व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक, तृतीयपंथी आणि विशेष दुर्बल आदिवासी गट यांसारख्या विविध गटातील मतदारांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला आहे.
BulletsIn
- 85 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि 40% हून अधिक अपंगत्व असलेल्या दिव्यांगांसाठी घरच्या आरामदायी वातावरणात मतदान करण्याची सुविधा 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये प्रथमच उपलब्ध करून देण्यात आली.
- मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि डॉ. सुखबीर सिंग संधू यांच्या नेतृत्वाखाली देशभरात एकत्रित प्रयत्नांमुळे विविध राज्यांमध्ये अनेक यशोगाथा पाहायला मिळाल्या.
- जागतिक स्तरावर नवीन मानके स्थापित करण्याच्या दृढ संकल्पामुळे भारतीय निवडणूक प्रक्रियेत सतत सुधारणा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
- संपूर्ण निवडणूक प्रक्रियेमध्ये सर्वसमावेशकतेची आणि सुगम्यतेची तत्त्वे आणि पद्धती अंतर्भूत करण्यासाठी भारतीय निवडणूक आयोग समर्पित आहे.
- 85 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि 40% हून अधिक अपंगत्व असलेल्या व्यक्तींना टपाली मतपत्रिकेद्वारे गृह मतदानाची सुविधा देण्यात आली आहे.
- मतदान कर्मचाऱ्यांच्या आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या सहभागातून मतदानाच्या गुप्ततेचे काळजीपूर्वक पालन करत गृह मतदान केले जात आहे.
- प्रत्येक मतदान केंद्र तळमजल्यावर असेल आणि रॅम्प, चिन्हे, पार्किंग, स्वतंत्र रांगा आणि स्वयंसेवकांसह सुसज्ज असेल याची खात्री करण्यात आली आहे.
- दृष्टिहीन मतदारांना मदत करण्यासाठी ईव्हीएम मशीनवर ब्रेल लिपी, ब्रेल सक्षम EPIC आणि मतदान चिठ्ठीची तरतूद करण्यात आली आहे.
- दिव्यांगांना मतदान केंद्रावर व्हीलचेअर, नेण्याची आणि आणण्याची सुविधा तसेच स्वयंसेवक सेवा यासारख्या विविध सुविधा दिल्या आहेत.
- ठाणे जिल्ह्यात तृतीयपंथी मतदार, लैंगिक कामगार आणि विशेष दुर्बल आदिवासी गट यांसारख्या उपेक्षित समुदायांची नोंदणी करण्यासाठी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.
