cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > National > फडणवीसांना जीवे मारण्याची धमकी, मुख्य आरोपीला ७ मार्चपर्यंत पोलीस कोठडी
National

फडणवीसांना जीवे मारण्याची धमकी, मुख्य आरोपीला ७ मार्चपर्यंत पोलीस कोठडी

CliQ INDIA
Last updated: March 3, 2024 4:49 pm
CliQ INDIA
Share
2 Min Read
SHARE

मुंबई, ३ मार्च : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल बदनामीकारक वक्तव्य करणे आणि जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या प्रकरणात मुख्य आरोपी किंचक नवले (३४) याला पोलिसांनी साताऱ्यातून अटक केली आहे. आरोपीला वांद्रे महानगर न्यायदंडाधिकारी न्यायालयाने ७ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, देवेंद्र फडणवीसांबद्दल युट्यूब चॅनलवर बदनामीकारक वक्तव्य आणि प्रक्षोभक भाषा वापरण्यात आली होती. सोबतच त्यांना जीवे मारण्याची धमकीही दिली होती. या संदर्भात शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते अक्षय पनवेलकर यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला होता. अक्षय यांच्या तक्रारीनंतर आधी नवी मुंबई परिसरातून योगेश सावंत यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. सांताक्रुझ पोलिसांनी भादंवि कलम १५३ (अ), ५००, ५०५ (३), ५०६ (२) व ३४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणी समाजात तेढ निर्माण करणाऱ्या व्हायरल व्हिडिओतील मुख्य आरोपी किंचक नवलेचा शोध सुरू होता. तो वेशांतर करून वेगवेगळ्या ठिकाणी राहत असल्याचं तपासात समोर आलं. अखेर सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने सांताक्रूझ पोलिसांनी त्याला शनिवारी सातारा येथील सदर बझार येथून अटक केली आहे. हा व्हिडिओ आपल्या एक्स हँडलवरून व्हायरल केल्याप्रकरणी योगेश सावंत याला याआधीच अटक करण्यात आली आहे. त्यानंतर त्याला मुंबईत आणून वांद्रे न्यायालयात हजर केले. अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना जीवे ठार मारण्याची धमकी कोणाच्या सांगण्यावरून दिली आणि तो व्हिडिओ कोणाच्या सांगण्यावरून अपलोड करत व्हायरल केला, या कटात आणखी कोण सामील आहे, याबाबतच्या चौकशीसाठी १० दिवसांची पोलीस कोठडी आवश्यक आहे, असं म्हणणं पोलिसांनी न्यायालयासमोर मांडलं. न्यायाधीशांनी नवलेला पाच दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली.

दरम्यान या प्रकरणात आधीच अटक करण्यात आलेला योगेश हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोशल मीडिया सेलचा उपाध्यक्ष आहे. त्यालाही ७ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

You Might Also Like

रेकॉर्डच्या विक्रमी उंचीवर चांदी – २.४५ लाख/किलो, सोने सर्वोच्च शिखराजवळ — जागतिक मागणी व आर्थिक अनिश्चिततेमुळे भाव वाढले
सोनम वांगचुक सहा महिन्यांनी लेहमध्ये परत, संवाद आणि आशेची हाक
काँग्रेसने पोस्ट केलेल्या पंतप्रधान मोदींच्या आईचा एआय व्हिडिओवर भाजपाची टीका
अहमदाबाद विमान अपघात : ‘पायलट दोषी नाही’, केंद्र आणि डीजीसीएचे सर्वोच्च न्यायालयात उत्तर
एअर इंडियाकडून घरगुती तिकिटांवर ₹399 इंधन अधिभार: १२ मार्चपासून लागू जेट इंधनाच्या वाढत्या किमतींमुळे विमान कंपन्यांच्या कामकाजावर परिणाम होत असल्याने, एअर इंडिया १२ मार्चपासून घरगुती तिकिटांवर ₹399 इंधन अधिभार लागू करणार आहे.

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article पॅरिस 2024 ओलंपिक्स वैश्विक आथ्लेटिक उत्कृष्टता प्रदर्शित करण्यास सज्ज
Next Article गरीब व निर्धन रुग्णांना खासगी, धर्मदाय रुग्णालयात मिळणार खात्रीशीर बेड
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?