सोलापूर 28 ऑक्टोबर ( हिं.स) : एमडी ड्रग्ज रॅकेट प्रकरणी आता नाशिक पोलीस ऍक्शनमोडमध्ये आले आहेत. सोलापूरातील एमडी ड्रग्ज कारखाना नाशिक पोलिसांनी उध्वस्त केला आहे, कोट्यवधी रुपयांचे एमडी ड्रग्ज आणि कच्चा मालही सापडपला आहे.सोलापूरातील काही संशयीतांना पोलिसांनी ताब्यातही घेतले आहे.
सोलापूरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. एमडी ड्रग्ज रॅकेट प्रकरणी आता नाशिक पोलीस ऍक्शनमोडमध्ये आले आहेत. सोलापूरातील एमडी ड्रग्ज कारखाना नाशिक पोलिसांनी उध्वस्त केला आहे, कोट्यवधी रुपयांचे एमडी ड्रग्ज आणि कच्चा मालही सापडपला आहे. सोलापूरातील काही संशयीतांना पोलिसांनी ताब्यातही घेतले आहे.नाशिकमधून मोठं ड्रग्ज रॅकेटचे प्रकरण समोर आल्यानंतर आता पोलिसांनी राज्यभरात छापे टाकण्यास सुरूवात केली आहे. आरोपी ललित पाटील याला पोलिसांनी ताब्यात घेऊन आता चौकशी सुरू केली आहे.ड्रग्ज माफिया ललित पाटील याने २ ऑक्टोबर रोजी ससून रुग्णालयातून पळ काढला. त्याच्या म्हणण्यानुसार त्याला पळवण्यात आले. मात्र, असे असताना पोलिसांचा हलदर्जीपणा हे देखील यातील एक मुख्य कारण होते. पोलिस सहआयुक्त संदीप कर्णिक यांनी याप्रकरणी अजून एका महिला अधिकाऱ्याला कर्तव्यात निष्काळजीपणा, हलगर्जीपणा आणि बेजबाबदारपणा केल्याप्रकरणी निलंबित करण्याचे आदेश काढले. सहायक पोलिस निरीक्षक सविता हनुमंत भागवत असे या निलंबित महिला अधिकाऱ्याचे नाव आहे. याआधी पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी एका महिला पोलिस उपनिरीक्षकासह नऊ कर्मचाऱ्यांचे निलंबन केले होते.
हिंदुस्थान समाचार
