मुंबई, 4 जानेवारी (हिं.स.) : रेल्वेने प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन लोकमान्य टिळक टर्मिनस ते कानपूर दरम्यान सुपरफास्ट साप्ताहिक विशेष ट्रेन चालवणार आहे. तपशील खालीलप्रमाणे.
लोकमान्य टिळक टर्मिनस – कानपूर सुपरफास्ट साप्ताहिक विशेष (२६ फेर्या) ०४१५२ सुपरफास्ट साप्ताहिक स्पेशल लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दि. ०६.०१.२०२४ ते दि. ३०.०३.२०२४ पर्यंत (१३ फेर्या) दर शनिवारी १७.१५ वाजता सुटेल आणि कानपूर सेंट्रल येथे दुसऱ्या दिवशी १५.४५ वाजता पोहोचेल.
०४१५१ सुपरफास्ट साप्ताहिक विशेष गाडी दि. ०५.०१.२०२४ ते दि. २९.०३.२०२४ पर्यंत (१३ फेर्या) दर शुक्रवारी १५.२५ वाजता कानपूर सेंट्रल येथून सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी १४.५५ वाजता पोहोचेल.
थांबे: भुसावळ, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, प्रयागराज, भरवारी, सिराथू आणि फतेहपूर.
संरचना: १ वातानुकूलित द्वितीय, ८ वातानुकूलित तृतीय, ८ शयनयान आणि ७ जनरल द्वितीय श्रेणी २ लगेज कम गार्ड्स ब्रेक व्हॅन (२४ डबे)
आरक्षण: सुपरफास्ट साप्ताहिक विशेष ट्रेन क्रमांक ०४१५२ च्या विस्तारित फेऱ्यांसाठी विशेष शुल्कासह बुकिंग दि. ०५.०१.२०२४ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर उघडेल. या विशेष ट्रेनच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा.
प्रवाशांनी विशेष सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
हिंदुस्थान समाचार
