नवी दिल्ली, 19 नोव्हेंबर (हिं.स.) : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी छठ पूजेनिमित्त देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत.
“छठ पूजेच्या मंगल प्रसंगी मी माझ्या सर्व देशवासीयांना मनःपूर्वक शुभेच्छा देते,” असे राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
छठ पूजा हा सूर्यदेवाच्या उपासनेला समर्पित सण आहे. नद्या, तलाव आणि पाण्याच्या इतर स्त्रोतांबद्दल आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचे हे एक पर्व आहे. निसर्गाशी निगडित असलेला हा सण आध्यात्मिक चेतना जागृत करतो आणि पर्यावरण संवर्धनासाठी काम करण्याची प्रेरणा देतो. छठ पूजा हा सण आपल्याला आपला परिसर स्वच्छ ठेवण्याची आणि आपल्या दैनंदिन जीवनात शिस्त पाळण्याची आठवण करून देतो.
आपले जलस्रोत आणि पर्यावरण प्रदूषणमुक्त करून निसर्ग मातेचा आदर करण्याचा संकल्प करूया. या शुभ प्रसंगी मी सर्व नागरिकांच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करते.”
हिंदुस्थान समाचार
