नवी दिल्ली, 1 जानेवारी (हिं.स.) – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नवीन वर्षानिमित्त सर्व देशबांधवांना शुभेच्छा दिल्या आहेत.
“नवीन वर्षाच्या आनंददायी प्रसंगी, भारतात आणि परदेशात राहणाऱ्या सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा” असे राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
नवीन वर्षाचे आगमन म्हणजे नवे संकल्प आणि ध्येये घेऊन पुढे वाटचाल करण्याची संधी आहे. 2024 हे वर्ष सर्वांना सुख, शांती आणि भरभराटीचे जावो. आपण आपल्या देशाच्या प्रगतीत आपले योगदान देत राहू.
चला, नवीन वर्षाचे स्वागत करूया आणि एक समृद्ध समाज आणि राष्ट्र निर्माण करण्याची शपथ घेऊया.”
हिंदुस्थान समाचार
