cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > National > नन्हें फरिश्ते अंतर्गत आरपीएफकडून देशभरात 520 हून अधिक लहान मुलांची कुटुंबाशी पुनर्भेट
National

नन्हें फरिश्ते अंतर्गत आरपीएफकडून देशभरात 520 हून अधिक लहान मुलांची कुटुंबाशी पुनर्भेट

CliQ INDIA
Last updated: December 7, 2023 6:00 am
CliQ INDIA
Share
3 Min Read
SHARE

नवी दिल्ली, 6 डिसेंबर (हिं.स.) – नन्हें फरिश्ते मोहिमेंतर्गत आरपीएफकडून 520 हून अधिक लहान मुलांची त्यांच्या कुटुंबाशी पुनर्भेट घडवून आणण्यात आली आहे.

रेल्वे प्रवाशांना निर्धोक, सुरक्षित आणि आरामदायक प्रवासाचा अनुभव देण्यासाठी आरपीएफ अर्थात रेल्वे सुरक्षा दल अहोरात्र कार्यरत असते.

यावर्षीच्या नोव्हेंबर महिन्यात, आरपीएफने विविध मोहिमांच्या माध्यमातून प्रशंसनीय कामगिरी करून दाखवली आहे:-

मोहीम “नन्हें फरिश्ते” – हरवलेल्या मुलांची सुटका : “नन्हें फरिश्ते” या मोहीमेअंतर्गत आरपीएफने काळजी तसेच संरक्षणाची गरज असलेल्या 520हून अधिक लहान मुलांची त्यांच्या कुटुंबाशी पुनर्भेट घडवून आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. ही मुले विविध कारणांमुळे आपापल्या कुटुंबांपासून दुरावली होती.

मानवी तस्करी विरोधी उपक्रम (एएएचटी मोहीम) – नोव्हेंबर 2023 मध्ये आरपीएफच्या मानवी तस्करी विरोधी पथकांनी (एएचटीयुज) तस्करांच्या तावडीतून 35 जणांची सुटका केली.

मोहीम “जीवन रक्षा” – जीव वाचवणे : आरपीएफमधील जवानांच्या सावध तसेच जलद कृतीमुळे 224 प्रवाशांचा जीव वाचला. चालत्या गाडीतून चढता-उतरताना अपघाताने फलाटावर तसेच रेल्वेच्या रुळांवर पडल्यामुळे या प्रवाशांचा जीव धोक्यात आला होता.

महिला प्रवाशांचे सक्षमीकरण – “मेरी सहेली” उपक्रम : नोव्हेंबर 2023 मध्ये 229 “मेरी सहेली” पथकांनी 13,552 रेल्वे गाड्यांना भेटी दिल्या आणि 410,259 महिला प्रवाशांना सुरक्षितताविषयक सेवा दिली. महिलांसाठी राखीव असलेल्या डब्ब्यातून प्रवास करताना आढळून आलेल्या 4618 व्यक्तींविरुद्ध देखील आरपीएफने कारवाई केली.

तिकीटांच्या दलालांचे गैरव्यवहार रोखणे (मोहीम “उपलब्ध”) : तिकीट दलालांविरुद्धच्या कारवाईदरम्यान आरपीएफने नोव्हेंबर 2023 मध्ये 392 जणांना अटक केली आणि त्यांच्याविरुद्ध कायद्यानुसार कारवाई केली. तसेच, आरपीएफच्या जवानांनी 42.28 लाख रुपयांची आगामी काळातील तिकिटे जप्त केली.

मोहीम “नार्कॉस” – अंमली पदार्थसंबंधी गुन्ह्यांशी लढा : या मोहिमेअंतर्गत अत्यंत प्रशंसनीय कामगिरी करत नोव्हेंबर 2023 मध्ये आरपीएफने 91 व्यक्तींना अटक केली आणि 3.69 कोटी रुपये किंमतीचे अंमली पदार्थ जप्त केले.

प्रवाशांच्या समस्यांना जलद प्रतिसाद : नोव्हेंबर 2023 मध्ये रेल्वे प्रवाशांनी नोंदवलेल्या 21,800 हून अधिक तक्रारींना प्रतिसाद देत, आरपीएफने या तक्रारी सोडवण्यासाठी आवश्यक कार्यवाही केली.

मोहीम “यात्री सुरक्षा” – प्रवाशांचे संरक्षण : नोव्हेंबर2023 मध्ये आरपीएफने प्रवाशांविरुद्धच्या विविध गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या 229 गुन्हेगारांना अटक केली आणि त्यांना पुढील कारवाईसाठी संबंधित जीआरपी/पोलीस दलाच्या ताब्यात दिले.

“संरक्षा मोहिमे”च्या माध्यमातून सुरक्षिततेची सुनिश्चिती : आरपीएफने चालत्या रेल्वे गाड्यांवर दगड भिरकावण्याची धोकादायक कृती करणाऱ्या 28 जणांना नोव्हेंबर 2023 मध्ये अटक केली.

गरजू प्रवाशांना मदत (मोहीम सेवा) : नोव्हेंबर 2023 मध्ये रेल्वे प्रवासादरम्यान आरपीएफने 191 वयोवृद्ध, आजारी किंवा जखमी प्रवाशांना आवश्यक मदत पुरवली.

बेकायदेशीर वस्तूंच्या वाहतुकीला अटकाव (मोहीम सतर्क) : आरपीएफने बेकायदेशीररित्या वाहतूक करण्यात येत असलेली 10,54,630 रुपये मूल्याची तंबाखू उत्पादने आणि मद्य जप्त केले आणि या वाहतुकीशी संबंधित 67 जणांना ताब्यात घेऊन संबंधित कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांकडे सुपूर्द केले.

हिंदुस्थान समाचार

You Might Also Like

विश्वचषक विजेत्या भारतीय महिला क्रिकेट संघाने घेतली राष्ट्रपतींची भेट
के. कविता यांना 15 एप्रिलपर्यंत सीबीआय कोठडी
होर्मुझची सामुद्रधुनी पार करून भारतीय एलपीजी टँकर ‘शिवालिक’ मुंद्रा बंदरात दाखल
इंडिया पोस्टने राष्ट्रीय पत्र लेखन मोहीम ढाई आखरची अंतिम मुदत 31 जानेवारीपर्यंत वाढवली
मिलिंद देवरांचा कॉंग्रेसला रामराम, प्राथमिक सदस्यत्वाचा दिला राजीनामा

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त विधानभवन येथे अभिवादन
Next Article राज्यपाल रमेश बैस यांची भागवत कथा सप्ताहाला भेट
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?