गव्हाची उपलब्धता वाढवण्यासाठी केंद्राचा निर्णय
नवी दिल्ली, 09 डिसेंबर (हिं.स.) : केंद्र सरकारने खुल्या बाजार विक्री योजनेच्या (ओएमएसएस) अंतर्गत जानेवारी-मार्च 2024 या कालखंडात भारतीय खाद्य मंडळाच्या (एफसीआय) भांडारातील 25 लाख टनांचा अतिरिक्त गहू विकण्याचा निर्णय घेतला आहे.
केंद्राच्या निर्णयामुळे घरगुती बाजारपेठेत बाजारात गव्हाची उपलब्धता कायम राहील. सामान्यांना विकत घेण्यात कोणत्याही अडचणी येणार नाही. त्यासोबतच गव्हाच्या किमती नियंत्रणात राहण्यास मोठी मदत होणार आहे. खाद्य सचिव संजीव चोपडा यांनी सांगितले की, सरकारने एफसीआयला गहू उत्पादक राज्यांमध्ये खरेदीचा अवधी वगळता संपूर्ण वर्षभर ओएमएसएस योजनेंतर्गत ई-लिलावाद्वारे घाऊक विक्रेत्यांना गहू विकण्याचे आदेश दिले होते. साप्ताहिक ई-लिलावाच्या माध्यमातून एफसीआयने आतापर्यंत घाऊक विक्रेत्यांना 44.6 लाख टन इतक्या गव्हाची विक्री केली आहे. यामुळे खुल्या बाजारात मोठ्या प्रमाणावर गहू उपलब्ध झाला आहे.
हिंदुस्थान समाचार
