cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > National > “आपल्या अर्थपूर्ण चर्चेतूनच सभागृहाची प्रतिष्ठा वाढेल” – ओम बिर्ला
National

“आपल्या अर्थपूर्ण चर्चेतूनच सभागृहाची प्रतिष्ठा वाढेल” – ओम बिर्ला

CliQ INDIA
Last updated: February 8, 2026 6:35 am
CliQ INDIA
Share
2 Min Read
SHARE

पाटणा, 07 फेब्रुवारी (हिं.स.) : बिहार विधानसभेच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सभागृहातील शिष्टाचार आणि ज्ञानाधारित चर्चेचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी नमूद केले की, “आपण जितकी अर्थपूर्ण चर्चा करू, तितकीच सभागृहाची मर्यादा वाढेल. सभागृहात बोलताना तथ्ये आणि पार्श्वभूमीची माहिती असणे अत्यावश्यक आहे.”

विधानसभेच्या केंद्रीय सभागृहात शनिवारी झालेल्या समारंभात ओम बिर्ला यांनी जनप्रतिनिधींना संसदीय शिष्टाचारांचे पालन करण्याचे आवाहन केले आणि ज्ञानाधारित चर्चेद्वारे लोकशाही मजबूत करण्यावर भर दिला.

यावेळी त्यांनी घटत चाललेल्या संसदीय गरिमेबद्दल चिंता व्यक्त केली आणि घोषणाबाजी, गोंधळ निर्माण करणे किंवा सभागृहात निदर्शने करणे यापासून दूर राहण्याचे आवाहन केले.

ओम बिर्ला म्हणाले की, “लोकशाही संवाद, तर्क आणि विचारमंथनातून मजबूत होते, संघर्षातून नाही.” “सशक्त आमदार, मजबूत लोकशाही” या विषयावर बोलताना त्यांनी सांगितले की जे जनप्रतिनिधी संविधान, संसदीय परंपरा आणि लोकशाही मूल्ये यांचा सखोल अभ्यास करतात, तेच सभागृह अधिक प्रभावी बनवू शकतात. ग्रामीण व दुर्गम भागांतील प्रश्न, शेतकरी, महिला आणि युवकांशी संबंधित मुद्दे प्राधान्याने सभागृहात मांडल्यास जनतेचा आवाज धोरणनिर्मितीपर्यंत पोहोचेल, असेही त्यांनी नमूद केले.

लोकसभा अध्यक्षांनी आमदारांच्या नैतिक मूल्यांवर, जबाबदारीच्या भावनेवर आणि संवैधानिक प्रक्रियेच्या समजूतदारपणावर भर दिला. त्यांनी योग्य प्रशिक्षण, विधेयक मसुदा तयार करण्याची क्षमता आणि संशोधनाधारित माहिती या गोष्टींचा उल्लेख करून, आमदारांना सक्षम व पारदर्शक शासनव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावण्यासाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमात त्यांनी बिहार विधानसभेत “नेवा प्लॅटफॉर्म”च्या माध्यमातून डिजिटल हाऊसची सुरुवात केली. यामुळे कार्यवाही अधिक पारदर्शक, तथ्याधारित आणि प्रभावी होईल, तसेच आमदारांना चर्चेदरम्यान सशक्त आणि प्रमाणिक मांडणी करण्यात मदत मिळेल. समारंभात विधानसभा सदस्य, अधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

—————–

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule

You Might Also Like

बांगलादेश सीमेवर 1.39 कोटींचे परकीय चलन जप्त
सोलापुरात मिनी बसचा अपघात, तिघांचा मृत्यू,15 जखमी | BulletsIn
तामिळनाडू : तीन शिक्षकांचा विद्यार्थीनीवर लैंगिक अत्याचार | BulletsIn
‘आरबीआय’ची 5 सहकारी बँकांवर कारवाई
एनएचआरसी ने टीसीएस नाशिक प्रकरणात महाराष्ट्र डीजीपीला अहवाल सादर करण्यास सांगितले जेव्हा निदा खान यांनी अग्रिम जामीनासाठी न्यायालयात धाव घेतली

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article पीओकेच नाही तर अक्साई चीनही भारताचाच भाग; व्यापार करारानंतर अमेरिकेने जारी केला भारताचा नकाशा
Next Article टी-२० विश्वचषकात रोमारियो शेफर्डच्या हॅटट्रिकमुळे वेस्ट इंडिजची विजयी सलामी
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?