नवी दिल्ली, १५ ऑक्टोबर : विश्वचषक स्पर्धेत भारताने पाकिस्तानवर विजय मिळवला. यावर भारतातील इस्रायलचे राजदूत नाओर गिलॉन यांनी आनंद व्यक्त केला आहे. यावेळी त्यांनी पाकिस्तानी संघावर टीका केली.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत त्यांनी म्हटले आहे की, क्रिकेट विश्वचषकामध्ये खेळल्या गेलेल्या भारत-पाकिस्तान सामन्यात भारताने विजय मिळवला याचा आम्हाला आनंद आहे आणि पाकिस्तान आपला विजय हमासच्या दहशतवाद्यांना समर्पित करू शकला नाही. सामन्यादरम्यान आमच्या भारतीय मित्रांनी पोस्टर दाखवून इस्रायलशी आपली एकजूट दाखवली. यामुळे आपण खूप भावूक झालो आहोत.
भारत-इस्रायलच्या पंतप्रधानांचे फोटो असलेले पोस्टर शेअर
गिलॉन यांच्या पोस्टमध्ये त्यांनी एक फोटो देखील शेअर केला आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती पंतप्रधान मोदी आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या फोटो असलेले पोस्टर धरलेले दिसत आहे. दहशतवादाविरोधात सुरू असलेल्या युद्धात भारत इस्रायलच्या पाठीशी उभा असल्याचे पोस्टरवर लिहिले आहे.
