ढाका, 21 जुलै (हिं.स.) :
बांगलादेश हवाई दलाचे एक एफ-७ प्रशिक्षण विमान एका महाविद्यालयाच्या आवारात कोसळले.
विमान महाविद्यालयाच्या इमारतीला आदळल्यानंतर या अपघातात एका युवकाचा मृत्यू झालातर १०० हून अधिक नागिरक जखमी झाले आहेत.
अपघाताच्या वेळी माइलस्टोन महाविद्यालयात मुले उपस्थित होती. विमान कोसळल्यानंतर
शाळा आणि महाविद्यालयात गोंधळ उडाला. अग्निशमन दल आणि बचाव पथके घटनास्थळी पोहोचली
आहेत. दुर्घटनास्थळी बचाव कार्य सुरू केले आहे.
उत्तरा मेडिकल कॉलेज रुग्णालयाचे उपसंचालक डॉ. बजलुर
रहमान म्हणाले की, प्राथमिक उपचारानंतर सुमारे ६० जखमींना बर्न
इन्स्टिट्यूटमध्ये पाठवण्यात आले आहे.तर किरकोळ जखमी
असलेल्या २५ जणांवर उपचार सुरू आहेत. हजरत शाहजलाल आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या एका
वरिष्ठ अधिकाऱ्यानेही घटनेची पुष्टी केली. माहिती मिळताच बांगलादेशी लष्कराचे
सदस्य, अग्निशमन सेवा आणि नागरी संरक्षण दलाच्या आठ
गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि बचावकार्य सुरु करण्यात आले.
प्रशिक्षण
विमानाने दुपारी १:०६ वाजता उड्डाण केले आणि उड्डाणानंतर लगेचच ते कोसळले.
अपघातानंतर विमानाला आग लागली. आग विझवण्यासाठी आठ अग्निशमन दलाच्या गाड्या
घटनास्थळी पोहोचल्या. माइलस्टोन स्कूल अँड कॉलेजच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, विमान
शाळेच्या गेटजवळ पडले. विमान ज्या शाळेच्या परिसरात कोसळले त्या शाळेच्या परिसरात
वर्ग सुरू होते. जखमींना एक-एक करून बाहेर काढले जात आहे.
—————
हिंदुस्थान समाचार / Vrushali Surendra
