cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > International > खलिस्तानी दहशतवादी पन्नूच्या ‘बॉडीगार्ड’ला कॅनडामध्ये अटक
International

खलिस्तानी दहशतवादी पन्नूच्या ‘बॉडीगार्ड’ला कॅनडामध्ये अटक

CliQ INDIA
Last updated: September 23, 2025 6:39 am
CliQ INDIA
Share
2 Min Read
SHARE

ओटावा, 22 सप्टेंबर (हिं.स.)। कॅनडाने खलिस्तानी इंद्रजीत सिंह गोसलला अटक केली आहे. भारत आणि कॅनडामधील राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पातळीवरील बैठकीनंतर खलिस्तानी तत्वांवर ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. इंद्रजीत सिंह गोसल हा सिख्स फॉर जस्टीस (एसएफजे) या संघटनेच्या नामांकित खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंह पन्नू याचा पर्सनल सिक्युरिटी ऑफिसर होता. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी त्यांच्या कठोर संदेशाद्वारे कॅनडाच्या मार्क कार्नी सरकारवर दबाव टाकला होता की त्यांनी खलिस्तानी दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करावी आणि त्यानंतरच ही कारवाई झाली आहे.

जून 2023 मध्ये हरदीप सिंह निज्जरच्या मृत्यूनंतर, इंद्रजीत सिंह गोसल अमेरिकेतील खलिस्तानी संघटना सिख्स फॉर जस्टीससाठी कॅनडामध्ये मुख्य आयोजक बनला होता.36 वर्षीय इंद्रजीत याला कॅनडा पोलिसांनी मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये ग्रेटर टोरांटो एरियामधील (जीटीए) एका हिंदू मंदिरात घडलेल्या हिंसक घटनेप्रकरणी अटक केली होती. मात्र, नंतर त्याला काही अटींसह जामिनावर सोडण्यात आले.

इंद्रजीत सिंह गोसल हा कॅनडामध्ये खलिस्तानसाठी जनमतसंग्रह घेण्याचा कोऑर्डिनेटर आहे आणि सध्या त्याच्यावर शस्त्रास्त्रांशी संबंधित गुन्ह्यांमुळे अटक करण्यात आली आहे. तो गुरपतवंत सिंह पन्नूचा सहयोगी आणि सुरक्षा अधिकारी आहे. भारत सरकारने गुरपतवंत सिंह पन्नूला “खलिस्तानी दहशतवादी” म्हणून नामांकित केले आहे.

सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला, कॅनडा सरकारने आपल्या अंतर्गत अहवालामध्ये हे मान्य केले होते की, खलिस्तानी दहशतवादी संघटना त्यांच्या देशात सक्रिय आहेत, आणि भारताविरुद्ध दहशतीसाठी त्यांना कॅनडामधून निधी मिळतो.

या अहवालात, बब्बर खालसा इंटरनॅशनल आणि इंटरनॅशनल SYF या संघटनांचा उल्लेख होता, ज्या कॅनडाच्या आपराधिक कायद्यानुसार दहशतवादी संघटना म्हणून सूचीबद्ध आहेत. अहवालात असेही म्हटले आहे की, हे अतिरेकी गट आता लहान वैयक्तिक गटांमार्फत कार्य करतात, जे कोणत्याही विशिष्ट संघटनेशी बांधील नसले तरी खलिस्तानच्या मुद्द्याला सक्रिय पाठिंबा देतात.

—————

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode

You Might Also Like

जैश-ए-मोहम्मदच्या संघटनेच्या महिला विंगमध्ये ५,००० पेक्षा जास्त महिलांची भरती
अमेरिकेच्या गुप्तचर अहवालानुसार: युद्धानंतरही इराणमध्ये सत्तापालट होण्याची शक्यता कमी
शी यांनी तैवानवरील मुद्द्यावर ट्रंपला इशारा दिला जेव्हा उच्च-दांडग्या बीजिंग शिखर परिषदेने जागतिक शक्ती राजकारणाला नवे स्वरूप दिले
इराणकडून नोबेल शांतता पुरस्कार विजेत्या नरगिस मोहम्मदी यांना साडेसात वर्षांची शिक्षा
अमेरिकेचा संयुक्त राष्ट्रसंघातील मतदानातून अलिप्तता, गाझा युद्धविरामाची मागणी करणारे ठराव 14-0 ने मंजूर

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article सोलापूरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट मैदान उभारणार
Next Article जबलपूरमध्ये होणार संघाच्या अखिल भारतीय कार्यकारी मंडळाची बैठक
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?