cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > International > अमेरिकेत ६ वर्षांत पहिला शटडाऊन लागू ; सरकारी कामकाज बंद
International

अमेरिकेत ६ वर्षांत पहिला शटडाऊन लागू ; सरकारी कामकाज बंद

CliQ INDIA
Last updated: October 2, 2025 6:34 am
CliQ INDIA
Share
2 Min Read
SHARE

वॉशिंग्टन , 1 ऑक्टोबर (हिं.स.)। अमेरिकेत पुन्हा एकदा सरकार ठप्प होण्याच्या मार्गावर आहे. ट्रम्प सरकार अधिकृतपणे शटडाऊन झालं आहे. ट्रम्प सरकारच्या निधीवर तात्पुरता ताळा बसला आहे.कारण त्याला संसदेकडून आवश्यक मान्यता मिळाली नाही. ट्रम्प सरकारला खर्च विधेयक संसदेमध्ये मंजूर करण्यात अपयश आलं आणि त्यानंतर मध्यरात्रीपासून सरकारी निधी बंद झाला आहे. गेल्या ६ वर्षांतील हा पहिला सरकारी शटडाऊन आहे.

शटडाऊनमुळे संपूर्ण अमेरिकेतील सरकारी संस्था तात्पुरत्या बंद होतील. सरकारी बंद अंतर्गत, अनावश्यक मानल्या जाणाऱ्या संघीय कर्मचाऱ्यांना पगाराशिवाय रजेवर पाठवले जाईल, तर सैन्य कर्मचाऱ्यांसह अत्यावश्यक सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देखील पगाराशिवाय काम करावं लागेल.

अमेरिकेत दरवर्षी १ ऑक्टोबरपासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होतं. पण यावेळी ट्रम्प सरकार खर्च विधेयक मंजूर करून घेण्यात अयशस्वी ठरलं. त्यामुळे रात्री १२:०१ वाजता शटडाऊन लागू झाला आहे. यामुळे आता ४०% सरकारी कर्मचारी, म्हणजेच सुमारे ८ लाख कर्मचारी, पगाराशिवाय तात्पुरत्या रजेवर जाऊ शकतात. कायदा-सुव्यवस्था, सीमा सुरक्षा, वैद्यकीय आणि हवाई सेवा यांसारख्या आवश्यक सेवा सुरू राहतील. पण अन्न सहाय्य कार्यक्रम, अन्न व पेय तपासणी, केंद्र सरकार चालवत असलेल्या शाळा, विद्यार्थ्यांचे कर्ज यांसारख्या सुविधा मर्यादित किंवा पूर्णपणे बंद केल्या जाऊ शकतात. वाहतूक सेवांवरही प्रभाव पडणार आहे, अनेक एअरलाईन्सच्या सेवांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली असून उड्डाणांमध्ये विलंब होऊ शकतो.

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की,शटडाऊन जितका लांबेल तितका त्याचा परिणाम गंभीर असेल. या शटडाऊनचा बाजारावर व संपूर्ण अर्थव्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. ट्रम्प सरकारने शटडाऊन टाळण्यासाठी त्यांच्या फंडिंगमध्ये ७ आठवड्यांची वाढ करण्यासाठी मंगळवारी सीनेटमध्ये विधेयक सादर केलं. या विधेयकाला ५५ मते मिळाली, तर ४५ मते विरोधात पडली.पण मंजुरीसाठी किमान ६० मतांची गरज होती, जी मिळाली नाही.

विरोधी डेमोक्रॅटिक पक्षाने आरोप केला आहे की राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या रिपब्लिकन पक्षाने आरोग्य सेवांबाबतच्या मागण्या मान्य केल्या नाहीत, आणि त्यामुळे खर्च विधेयक बिल मंजूर न करून सरकारच्या निधीवरच ताळा घातला आहे. शेवटी, सीनेटने निधी वाढवलेला नसतानाच संपूर्ण दिवसासाठी अधिवेशन तहकूब केलं. याचा अर्थ असा की बुधवारी रात्री १२:०१ वाजता (स्थानिक वेळेनुसार) शटडाऊन सुरू झाला.

—————

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode

You Might Also Like

अमेरिकेची 75 देशांच्या नागरिकांसाठी व्हिसा प्रक्रिया स्थगित
इंडोनेशिया: सुलावेसी प्रांतात मुसळधार पावसामुळे पूर, १६ जणांचा मृत्यू
वाढत्या प्रादेशिक संघर्षात इराणची शेजाऱ्यांकडे माफी, अमेरिकेची ‘बिनशर्त शरणागती’ची मागणी फेटाळली
ट्रम्प यांचा इराणच्या विष्फोटक युरेनियमबाबतचा इशारा एका रात्रीत जागतिक स्तरावर आण्विक तणाव निर्माण करतो.
पश्चिम आशियातील संकटाच्या पार्श्वभूमीवर इराणचा भारताला मोठा संदेश

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article सोलापूर : वन्यजीव सप्ताह निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन
Next Article संघ त्याग, नि:स्वार्थ सेवा, राष्ट्र उभारणी आणि शिस्तीचे एक असाधारण उदाहरण – पंतप्रधान
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?