मुंबई, 29 जानेवारी, (हिं.स.)। चर्चेत असलेली क्राइम-थ्रिलर वेब सीरिज कोहरा 2 चा दुसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. यंदा अभिनेता बरुण सोबती सोबत अभिनेत्री मोना सिंग महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. दोघेही मिळून एका नव्या, अधिक धोकादायक प्रकरणाचा पर्दाफाश करत गुन्हेगारांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहेत. निर्मात्यांनी नुकताच ‘कोहरा 2’चा ट्रेलर रिलीज केला असून, तो पाहिल्यानंतर चाहत्यांमध्ये उत्सुकता आणि जोश वाढला आहे. या सिझनचे दिग्दर्शन सुदीप शर्मा आणि फैसल रहमान यांनी संयुक्तपणे केले आहे.
सस्पेन्स आणि थ्रिलने भरलेला ट्रेलर
सुमारे 2 मिनिटे 3 सेकंदांच्या ट्रेलरची सुरुवात एका तरुणीच्या रहस्यमय मृत्यूपासून होते. यावेळी कथा पंजाबमधील एका छोट्या शहराच्या पार्श्वभूमीवर उलगडते. गुन्ह्यांच्या गुंतागुंतीच्या गाठी सोडवण्यासाठी कमांडिंग अधिकारी धनवंत कौर (मोना सिंग) यांची नियुक्ती करण्यात येते. त्यांच्या सोबत सहायक सब-इन्स्पेक्टर अमरपाल गरुंडी (बरुण सोबती) आणि रहस्यांनी भरलेल्या मिशनवर खांद्याला खांदा लावून काम करतो. ट्रेलरमध्ये थ्रिल, सस्पेन्स आणि गुन्हेगारी जगताच्या अनसुलझ्या परतांचा प्रभावी वेध घेण्यात आला आहे.
11 फेब्रुवारीला होणार स्ट्रीमिंग
‘कोहरा 2’ ही सीरिज नेटफ्लिक्सवर 11 फेब्रुवारीपासून स्ट्रीम होणार आहे. पहिल्या सिझनला मिळालेल्या यशानंतर, दुसऱ्या सिझनलाही प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. विशेषतः मोना सिंग आणि बरुण सोबती यांची नवी जोडी आणि कथेमधील रहस्यमय खोली यामुळे ‘कोहरा 2’ फेब्रुवारी महिन्यातील मोठा वेब ट्रीट ठरण्याची शक्यता आहे.
—————
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर
