
* ‘ब्लॅक वॉरंट’ वेबसीरिजचा दबदबा
* पाताल लोक सीझन 2 सर्वोत्तम मालिका
मुंबई, १६ डिसेंबर (हिं.स.) : ओटीटी प्लॅटफॉर्मवरील उत्कृष्ट कलाकृतींचा गौरव करणाऱ्या प्रतिष्ठित ‘फिल्मफेअर ओटीटी अवॉर्ड्स २०२५’ (Filmfare OTT Awards 2025) सोहळ्यातील पुरस्कारांची घोषणा झाली. ओटीटी विश्वातील या दिमाखदार सोहळ्यात अनेक कलाकारांना मानाची ‘ब्लॅक लेडी’ देऊन सन्मानित करण्यात आले.
पाताल लोक सीझन २, ब्लॅक वॉरंट आणि खौफ यांसारख्या शोने अनेक पुरस्कार जिंकले. तर वेब ओरिजिनल चित्रपटांमध्ये गर्ल्स विल बी गर्ल्स, स्टोलन आणि सेक्टर ३६ यांनाही पुरस्कार मिळाले. याव्यतिरिक्त, ‘खौफ’ या सीरिजने सिनेमॅटोग्राफी, एडिटिंग, आणि व्हिएफएक्स सारख्या तांत्रिक पुरस्कारांवर वर्चस्व गाजवले. जयदीप अहलावत आणि अनन्या पांडे यांसारख्या कलाकारांनी त्यांच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. याशिवाय कपूर कुटुंबातील उगवता स्टार जहान कपूरच्या ‘ब्लॅक वॉरंट’ वेबसीरिजचा फिल्मफेअरमध्ये दबदबा दिसला.
फिल्मफेअर ओटीटी अवॉर्ड्सची ही सहावी आवृत्ती असून हा दिमाखदार सोहळा सोमवारी मुंबईत पार पडला. या सोहळ्याला आलिया भट्ट, विकी कौशल आणि इतर अनेक दिग्गज सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती, अनेक अभिनेते, दिग्दर्शक उपस्थित होते.
मालिका श्रेणीत पाताल लोक सीझन 2 ला समीक्षकांची सर्वोत्तम मालिका म्हणून निवडण्यात आले. ड्रामा मालिकेत सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जयदीप अहलावत यांना मिळाला, तर महिला श्रेणीत मोनिका पंवार यांना ‘खौफ’साठी सन्मानित करण्यात आले.
समीक्षक श्रेणीत जहान कपूर आणि रसिका दुगल यांना त्यांच्या दमदार अभिनयासाठी पुरस्कार मिळाला. कॉमेडी मालिकेत ‘रात जवान है’ ला सर्वोत्कृष्ट कॉमेडी मालिका म्हणून निवडण्यात आले.
तर, ‘कॉल मी बे’ मध्ये तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी अनन्या पांडेला कॉमेडी मालिकेत सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (महिला) चा पुरस्कार मिळाला.
पुरस्कारांर्थींची नावं
सर्वोत्कृष्ट सीरिज: ब्लॅक वॉरंट
सर्वोत्कृष्ट सीरिज (समीक्षक): पाताल लोक सीझन २
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (सीरिज): विक्रमादित्य मोटवाने, सत्यंशु सिंग आणि टीम (ब्लॅक वॉरंट)
सर्वोत्कृष्ट अभिनेता (सीरिज – पुरुष): जयदीप अहलावत – पाताल लोक सीझन २
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (कॉमेडी सीरिज – महिला): अनन्या पांडे – कॉल मी बे
सर्वोत्कृष्ट अभिनेता (कॉमेडी सीरिज – पुरुष): वरुण सोबती (रात जवां है) आणि स्पर्श श्रीवास्तव (दुपैय्या)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री (सीरिज – महिला): तिलोत्तमा शोमे – पाताल लोक सीझन २
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता (सीरिज – पुरुष): राहुल भट – ब्लॅक वॉरंट
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (सीरिज – महिला): मोनिका पनवार- खौफ
वेब ओरिजिनल फिल्म विभागातील विजेते:
सर्वोत्कृष्ट ओरिजिनल फिल्म: गर्ल्स विल बी गर्ल्स
सर्वोत्कृष्ट अभिनेता (फिल्म): अभिषेक बॅनर्जी- स्टोलन
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (फिल्म): सान्या मल्होत्रा – मिसेस
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (फिल्म): शुची तलाती – गर्ल्स विल बी गर्ल्स
—————
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी
