पुणे, १३ जानेवारी (हिं.स.) : ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांचे निधन झाले आहे. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी पुण्यातील राहत्या घरी आज, शनिवारी पहाटे अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर संगीत क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.
पहाटे झोपेत असताना प्रभा अत्रे यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर उपचारांसाठी त्यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्या आधीच त्यांचे निधन झाले होते. प्रभा अत्रे यांचे नातेवाईक अमेरिकेत असल्याने ते भारतात आल्यावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
प्रभा अत्रे या किराणा घराण्याच्या गायिका होत्या. संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल भारत सरकारने त्यांचा ‘पद्मश्री’, ‘पद्मभूषण’, ‘पद्मविभूषण’ अशा अनेक पुरस्कारांनी सन्मान केला आहे. तसेच ‘भारतरत्न’ या सर्वोच्च नागरी पुरस्कारानेही त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.
हिंदुस्थान समाचार
