मुंबई, 19 जानेवारी (हिं.स.) पॉपकॉर्न हा कोणत्याही प्रसंगासाठी पसंतीचा स्नॅक आहे, ज्यामध्ये बटर्ड, सॉल्टेड, केटल-कूक्ड आणि कॅरेमल-डेझल्ड अशा चविष्ट व उत्साहवर्धक फ्लेवर्सचा समावेश असतो. चालत असो, चित्रपट पाहत असो किंवा लिव्हिंग रूममध्ये किवा कामाच्या ठिकाणी काहीसा आराम करत असो पॉपकॉर्नचा सहजपणे आस्वाद घेता येतो आणि त्यामधून उत्साहवर्धक अनुभव मिळतो. नॅशनल पॉपकॉर्न डे या आवडल्या ट्रीटला साजरा करत आपल्याला समाधानकारक क्रंचचा अनुभव देतो. एण्ड टीव्ही कलाकार आशुतोष कुलकर्णी (कृष्णन बिहारी वाजपेयी, ‘अटल’), गझल सूद (काटे सिंग, ‘हप्पू की उलटन पलटन’) आणि शुभांगी अत्रे (अंगूरी भाबी, ‘भाबीजी घर पर है’) दिवसातून कधीची त्यांच्या चवींची पूर्तता करणाऱ्या आवडत्या पॉपकॉर्न फ्लेवर्सबाबत सांगत आहेत.
एण्ड टीव्हीवरील मालिका ‘अटल’मध्ये कृष्णन बिहारी वाजपेयीची भूमिका साकारणारे आशुतोष कुलकर्णी म्हणाले, ”मला स्वत:ला गोड पदार्थ खूप आवडत असल्यामुळे मी चॉकलेट्स आणि कँडी बार्सचा मनसोक्त आस्वाद घेतो. यामधून उत्तम चवीचा आनंद मिळत असला तरी चॉकलेट पॉपकॉर्न सारख्या समाधानकारक क्रंचचा आस्वाद अद्वितीय आहे. या उत्साहवर्धक ट्रीटमध्ये गोडवा आणि स्वादिष्टतेचे परिपूर्ण संतुलन आहे, ज्यामुळे ते चॉकलेटप्रेमींना हवेहवेसे वाटते. मिल्क, डार्क किंवा व्हाइट चॉकलेट असो कुरकुरीत पॉपकॉर्नसोबत वेल्वेटी टेक्स्चर सर्वोत्तम कॉम्बो आहे. मला माझ्या पत्नीसोबत डेटिंग करण्याचे सुरूवातीचे दिवस आजही आठवतात, जेथे डेटिंगच्या वेळी आम्ही पॉपकॉर्नचा नक्की आस्वाद घ्यायचो. आम्ही विविध फ्लेवर्सचा आस्वाद घेतला आणि मला चॉकलेट खूप आवडू लागले. माझी ही आवड पाहता माझ्या पत्नीने विविध फ्लेवर्ससोबत प्रयोग केले आणि चॉकलेटप्रती माझ्या या आवडीला अधिक अद्भुत बनवले. पॉपकॉर्न कालातीत लक्षवेधक स्नॅक आहे, जे चवींची पूर्तता करण्यामध्ये कधीच अयशस्वी ठरत नाही.”
मालिका ‘हप्पू की उलटन पलटन’मधील गझल सूद ऊर्फ काटे सिंग म्हणाली, ”स्पाइसी-फूडप्रेमी असल्यामुळे मला मसालेदार पॉपकॉर्न खूप आवडतात. जलापेनो झिंग असो किंवा श्रीराचा किक असो मला माझ्या स्नॅक्समध्ये अतिरिक्त चटपटीतपणा आवडतो. मूव्ही नाइट्स किंवा कोणत्याही प्रसंगासाठी परिपूर्ण असलेले पॉपकॉर्न माझे पसंतीचे असून दैनंदिन ट्रिट आहेत, जे माझे आवडते स्नॅक बनले आहे. चालत-फिरत असो किंवा शूटिंगसाठी तयारी करत असो माझ्या बॅकपॅकमध्ये नेहमी पॉपकॉर्नची बॅग असते, ज्यामुळे मला कधीही, कुठेही पॉपकॉर्नचा आस्वाद घेता येतो. रात्री उशिरा लागणाऱ्या भूकेचे शमन करण्यासाठी मी पॉपकॉर्न पॅकेट्सचा स्टॉक करून ठेवला आहे. तर मग, यंदा पॉपकॉर्न डे निमित्त आवडत्या फ्लेवर्सचा आस्वाद घ्या आणि काही गोड व मसालेदार आठवणी तयार करा.” मालिका ‘भाबीजी घर पर है’मधील शुभांगी अत्रे ऊर्फ अंगूरी भाबी म्हणाल्या, ”प्रत्येकजण कालातीत गोड पदार्थ कॅरेमल पॉपकॉर्नचा आस्वाद घेतो. हा मूव्ही नाइटसाठी योग्य निवड असण्यासह गोड पदार्थ आवडणाऱ्यांसाठी परिपूर्ण आहे. माझे हे आवडते स्नॅक मला समाधानकारक चव देण्यासह जुन्या आठवणींना उजाळा देते, जेथे बालपणी चित्रपटगृहामध्ये पॉपकॉर्नचा आस्वाद घेत चित्रपट पाहण्याच्या क्षणांची आठवण येते. वैविध्यपूर्ण ट्रिट असलेले हे स्नॅक कोणत्याही पदार्थासोबत सेवन केले जाऊ शकते. आशी आणि मी घरामध्ये मनसोक्तपणे खाद्यपदार्थांचा आस्वाद घ्यायचे ठरवतो तेव्हा मी बटर, चीज किंवा चॉकलेट अशा विविध पॉपकॉर्न प्रकारांसह प्रयोग करते. आम्हा दोघींच्या चवी देखील समान आहेत, आम्हाला कॅरेमल खूप आवडते, ज्यामुळे कॅरेमेलाइडज्ड गोड व कुरकुरीत पॉपकॉर्नचा आस्वाद घेतो. माझ्या मते, पॉपकॉर्न व कॅरेमलच्या क्लासिक कॉम्बोमध्ये सामान्य क्षणांना असामान्य करण्याची जादू सामावलेली आहे. प्रत्येक पॉपकॉर्न आनंद देतो, जीवनातील लहान क्षणांच्या आनंदाची आठवण करून देतो, ज्यामधून उत्साहवर्धक स्वादाचा अनुभव मिळतो.”
तुमच्या आवडत्या कलाकारांना पाहण्यासाठी पाहत राहा मालिका ‘अटल’ रात्री ८ वाजता, ‘हप्पू की उलटन पलटन’ रात्री १० वाजता आणि ‘भाबीजी घर पर है’ रात्री १०.३० वाजता दर सोमवार ते शुक्रवार फक्त एण्ड टीव्हीवर!
हिंदुस्थान समाचार
