
परभणी, 21 ऑगस्ट, (हिं.स.)। परभणीचे रहिवासी उमाकांत पंडितराव पाटील यांना अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ, मुंबई तर्फे “संगीत रत्न पुरस्कार” प्रदान करण्यात आला. नेरूळ (मुंबई) येथे आयोजित कार्यक्रमात पद्मविभूषण डॉ. सोनल मानसिंह यांच्या हस्ते, तसेच मंडळाचे अध्यक्ष सूर्यवंशी व पदाधिकार्यांच्या उपस्थितीत हा सन्मान पाटील यांना प्रदान करण्यात आला.
उमाकांत पाटील यांनी आपले संगीत शिक्षण सुप्रसिद्ध गायक सुरमणी डॉ. पं. कमलाकर परळीकर यांच्याकडे अलंकार पर्यंत पूर्ण केले आहे. ते म. रा. विद्युत वितरण कंपनीमधून सेवानिवृत्त झाले असून संगीत क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांच्या पुढील संगीत वाटचालीसाठी विविध स्तरांतून त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत.
—————
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis
