cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > Entertainment > ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ला मिळाले आपले प्रतिभावान टॉप 6
Entertainment

‘इंडियाज गॉट टॅलेंट’ला मिळाले आपले प्रतिभावान टॉप 6

CliQ INDIA
Last updated: November 2, 2023 11:00 pm
CliQ INDIA
Share
6 Min Read
SHARE

मुंबई, 2 नोव्हेंबर (हिं.स.) : या जुलै महिन्यात सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर सुरू झालेल्या इंडियाज गॉट टॅलेंटने देशभरातील अनोखी आणि अद्वितीय प्रतिभा यशस्वीरीत्या प्रेक्षकांपुढे आणली आहे. सदाबहार अर्जुन बिजलाणीने या कार्यक्रमाची सूत्रे सांभाळली, तर किरण खेर, शिल्पा शेट्टी कुंद्रा आणि बादशाह या मनोरंजन क्षेत्रातील मान्यवरांनी परीक्षणाचे काम केले आहे. आता या अत्यंत लोकप्रिय टॅलेंट-आधारित रियालिटी शोमध्ये टॉप 6 स्पर्धकांची निवड करण्यात आली आहे.

‘विजयी विश्व हुनर हमारा’ हे आपल्या प्रतिभेतून सिद्ध करणारे हे टॉप 6 स्पर्धक आहेत – बॉलीवूड हिप-हॉप डान्सर्स- मुंबईचे झीरो डिग्री, छत्तीसगडचा एरियल मलखांब ग्रुप अबुझमाड मलखांब अकादमी, कोलकाताहून आलेला जबरदस्त डान्स ग्रूप गोल्डन गर्ल्स, ‘अॅक्रो डान्सर्स’ The ART (उत्तर प्रदेशचा अभिषेक, जयपूरचा राहुल आणि मुंबईचा तेजस), भारतीय शास्त्रीय फ्यूजन बॅंड रागा फ्यूजन (लुधियानाचा जयंत पटनाईक, मध्यप्रदेशचा अजय तिवारी, पटणाचा अमृतांशु दत्ता आणि पटणाचाच हर्षित शंकर) आणि नागालँडचा पॉवर पॅक्ड बॅंड महिला बॅंड.

छत्तीसगडमधील एका छोट्याशा गावातून आलेल्या अबुझमाड मलखांब अकादमीने हे सिद्ध करून दाखवले की, कठोर परिश्रम आणि दृढनिर्धार असल्यास काहीच अशक्य नसते. खांबांचा उपयोग करून त्यांनी केलेल्या मलखांबच्या करामती पाहून परीक्षकांनी त्यांची खूप वाहवा केली. इतकेच नाही, तर या शोमधला त्यांचा प्रवास पाहून अत्यंत प्रभावित झालेल्या किरण खेर आणि बादशाह या दोघा परीक्षकांनी तर या कला प्रकाराला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्या अकादमीला वित्तसहाय्य करण्याचे देखील वचन दिले. आपली वाटचाल आणि अंतिम फेरीत पोहोचल्याचा आनंद व्यक्त करताना या ग्रुपचा लीडर मनोज म्हणाला, “इंडियाज गॉट टॅलेंटच्या टॉप 6 मध्ये येणे हे आमचे स्वप्न होते, जे साकार झाले आहे. हा कठोर परिश्रम आणि निष्ठेचा प्रवास होता, ज्याला संपूर्ण देशाने पाठिंबा दिला. या भव्य मंचावर उभे राहताना आम्हाला किती कृतकृत्य वाटते आहे आणि अत्यानंद होत आहे हे शब्दांतून सांगता येणार नाही. आमचे गाव आज आमच्या नावाने ओळखले जाते आणि जगाच्या नकाशावर आमच्या गावाचा ठसा उमटवण्यासाठी या मंचाने आम्हाला मदत केली आहे. आगामी फिनालेमध्ये आम्ही आमचे सर्वस्व पणाला लावू आणि आमच्या परफॉर्मन्समधून आमच्यातील जादू लोकांपुढे सादर करू. हा अद्वितीय क्षण शक्य केल्याबद्दल धन्यवाद! फिनालेमध्ये आमचा प्रयत्न 100% असेल!”

नागालँडच्या महिला बॅंडमधल्या मुली जेव्हा ऑडिशन फेरीत गणवेशात मंचावर आल्या, तेव्हा त्यांनी सर्वांना थक्क केले आणि ‘आज की नारी, सबसे भारी’ हे सिद्ध केले. दर आठवड्याला त्यांनी सादर केलेला रॉक आणि फंक संगीत परफॉर्मन्स परीक्षक आणि आमंत्रित पाहुण्यांना देखील मंचावर जाऊन त्यांच्यासोबत ठेका धरायला लावायचा. या प्रवासाबद्दल बोलताना महिला बॅंडने सांगितले, “आम्ही सैन्यात काम करत असल्याने देशासाठी आणि आपल्या कुटुंबासाठी आम्ही कठोर परिश्रम करत असतो. इंडियाज गॉट टॅलेंटच्या माध्यमातून आम्हाला आमच्यातील प्रतिभा देशासमोर सादर करण्याची संधी मिळाली. टॉप 6 मध्ये येणे हे आमच्यासाठी स्वप्नपूर्ती सारखे आहे. सगळ्या परीक्षकांनी आणि खास करून बादशाहने प्रत्येक आठवड्यात आमच्या गाण्याचे जे कौतुक केले ते आमचे प्रयत्न सार्थक करणारे होते. आम्ही ही ट्रॉफी जिंकू आणि आपल्या देशाची मान ताठ करू अशी आम्हाला आशा आहे. स्त्रियांनी जर ठरवले तर त्या आपले घर, काम हे दोन्ही समर्थपणे सांभाळून आपल्या पॅशनचा देखील पाठपुरावा करू शकतात हे आम्ही दाखवून देऊ शकलो, याचा आम्हाला आनंद आहे.”

सतत काही ना काही नावीन्यपूर्ण करणाऱ्या आणि मंत्रमुग्ध करणारे डान्स परफॉर्मन्स देणाऱ्या 40 सदस्यांच्या गोल्डन गर्ल्स या ग्रुपने अप्रतिम रचना करून सर्वांना थक्क केले. त्यांच्या परफॉर्मन्सेसने केवळ परीक्षकच नाही, तर आमंत्रित पाहुणे देखील अचंबित होत होते. आपल्या या प्रवासाविषयी बोलताना गोल्डन गर्ल्स ग्रुपमधली सुमन म्हणते, “पहिल्या ऑडिशनपासून ते भव्य फिनालेपर्यंतचा हा संपूर्ण प्रवास म्हणजे आमच्यासाठी भावनांची एक रोलरकॉस्टर राईड होती. प्रत्येक परफॉर्मन्स आम्ही जीव ओतून केला आणि आता फिनालेमध्ये आम्ही तुमच्यासमोर उभे आहोत केवळ अंतिम फेरीतील स्पर्धक म्हणून नाही, तर प्रतिभा आणि चिकाटी यांच्या बळावर या प्रतिष्ठित मंचावर उलगडणाऱ्या अमर्याद शक्यतांचे प्रतीक म्हणून देखील! या अविस्मरणीय प्रवासात आम्हाला साथ आणि पाठिंबा देणाऱ्या प्रत्येकाचे मनःपूर्वक आभार!”

‘छोटा पॅक बडा धमाका’ ही उक्ती सार्थ करणाऱ्या मुंबईच्या झीरो डिग्री या बॉलीवूड हिप-हॉप डान्सर्स ग्रुपने परीक्षकांसोबत देशातील लक्षावधी प्रेक्षकांचे हृदय देखील जिंकून घेतले. दर आठवड्याला परीक्षक आणि आमंत्रित पाहुण्यांना प्रभावित करत, विविध अंगांनी आपली प्रतिभा सादर करून एक एक पायरी चढत हे छोटे वीर आता ग्रँड फिनालेमध्ये येऊन दाखल झाले आहेत. या प्रवासाविषयी बोलताना या ग्रुपची रचना करणारा मोहम्मद मोहसीन म्हणतो, “इंडियाज गॉट टॅलेंटच्या ग्रँड फिनालेमध्ये धडक देणे हे आम्हा झीरो डिग्रीसाठी स्वप्नवत आहे. या स्पर्धेत भाग घेणे हीच मुळात आमच्यासाठी आमच्या कम्फर्ट झोनच्या बाहेरची गोष्ट होती, कारण सुरुवातीला आम्ही फक्त आमच्या कुटुंबियांसाठी आणि मित्र-मंडळींसाठी परफॉर्म करायचो. आम्ही जेव्हा ऑडिशन दिली, तेव्हा आम्ही इथवर पोहोचू अशी कल्पनाच आम्ही केली नव्हती. प्रत्येक फेरी पार करताना आम्हाला अधिकाधिक आत्मविश्वास मिळत गेला आमच्या टीमचे सामर्थ्य बळावत गेले. इतर मुलांना आपल्या स्वप्नाचा पाठपुरावा करण्यासाठी कठोर परिश्रम घेण्यासाठी आमच्याकडून प्रेरणा मिळावी अशी आमची इच्छा आहे. आम्ही जिंकलो, तर आमचे आयुष्यच बदलून जाईल पण इथवर आल्यावर आम्हाला विजेते असल्यासारखेच वाटते आहे. अंतिम फेरीचा निकाल काहीही आला, तरी या प्रवासात आम्ही जो आनंद अनुभवला आहे, तो आम्ही कधीच विसरणार नाही.”

हिंदुस्थान समाचार

You Might Also Like

छत्रपती संभाजी महाराजांच्या तेजस्वी व्यक्तिमत्त्वाची झलक प्रदर्शित
रत्नागिरी : खल्वायनची त्रिशतकमहोत्सवी मासिक संगीत सभा शमिका रंगविणार
नागाव मराठी शाळेतच रंगला ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ चा ट्रेलर अनावरण सोहळा
सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते सातपुडा सुपर सेव्हियर माहितीपटाचे उद्घाटन
भूषण कुमार, विवेक अग्निहोत्रींकडून ‘ऑपरेशन सिंदूर वॉर’ चित्रपटाची घोषणा

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article शालेय राज्यस्तरीय पिस्तुल शूटिंग स्पर्धेकरिता नगरच्या 5 खेळाडूंची निवड
Next Article रत्नागिरी जिल्ह्यात दारूबंदी सप्ताहात ११३ गुन्हे दाखल
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?