मुंबई, 13 जानेवारी (हिं.स.) : अवधूत गुप्ते हे त्यांच्या चाहत्यांसाठी, संगीतप्रेमींसाठी नेहमीच काहीनाकाही नवीन घेऊन येत असतात. त्यांचा ‘लावण्यवती’ला मिळालेला प्रतिसाद पाहता अवधूत गुप्ते आणखी एक अल्बम घेऊन येत आहे. नुकताच सोशल मीडियावर अवधूत गुप्ते यांनी ‘विश्वमित्र’ ची घोषणा केली आहे. हा अल्बम १९ जानेवारीला येणार आहे. एकविरा म्युझिक प्रस्तुत ‘विश्वमित्र’ या अल्बमची निर्मिती गिरीजा गुप्ते यांनी केली आहे. या अल्बममध्ये ४ गाणी असणार आहेत. प्रत्येक गाणं एका तुटलेल्या हृदयाची कहाणी सांगेल. ‘लवचा खंजीर जर एकदा छातीत घुसला तर कुणाचं रक्त निघतं आणि कुणाची गाणी’ असं म्हणत लवकरच यातील गाणी प्रेक्षकांच्या भेटली येणार आहेत.
या अल्बमबद्दल अवधूत गुप्ते म्हणतात, पुन्हा एकदा तुमचे मनोरंजन करण्यासाठी आणि संगीतप्रेमींसाठी आम्ही एकविरा म्युझिक प्रस्तुत ‘विश्वमित्र’ अल्बम घेऊन आलो आहे. या अल्बममध्ये चार गाणी आहेत. ही चारही गाणी अधुऱ्या प्रेम कहाणीवर आधारित आहे. जसं प्रेम ‘लावण्यवती’ ला मिळालं तसंच ‘विश्वामित्र’ ला ही मिळेल याची मला खात्री आहे.“
हिंदुस्थान समाचार
