नवी दिल्ली , 16 फेब्रुवारी (हिं.स.)।चेक बाउन्स प्रकरणात तिहार कारागृहात बंद असलेला अभिनेता राजपाल यादव याला आज दिल्ली उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे.राजपालच्या जामीन अर्जावर सुनावणी करताना न्यायालयाने त्यांना १८ मार्चपर्यंत जामीन मंजूर केला आहे. यापूर्वी न्यायालयाने राजपाल यादवच्या वकिलांना अंतरिम जामिनासाठी दुपारी ३ वाजेपर्यंत ज्यांच्याकडून कर्ज घेतले त्या कंपनीच्या नावावर १.५ कोटी रुपये जमा करण्याचे आदेश दिले होते. अभिनेत्याने ही रक्कम जमा केल्यानंतर न्यायालयाने १८ मार्चपर्यंत जामीन मंजूर केला. तसेच १९ फेब्रुवारी रोजी त्याच्या भाचीचे लग्न असल्याची माहिती न्यायालयाला देण्यात आली. त्यामुळे सदर जामीन मंजूर करण्यात आला.
प्रकरणाची पुढील सुनावणी आता १८ मार्च रोजी होणार असून तोपर्यंत अभिनेता कारागृहाबाहेर राहील. न्यायालयाने राजपाल यादव याला सांगितले की पुढील सुनावणीवेळी तुम्हाला न्यायालयात प्रत्यक्ष उपस्थित राहावे लागेल किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर राहावे लागेल. कोणत्याही प्रकारची विसंगती आम्हाला मान्य नाही. यापूर्वी न्यायालयाने असेही म्हटले होते की जर तुम्ही आज दुपारी ३ वाजेपर्यंत ही रक्कम जमा केली, तर आम्ही तुम्हाला मुक्त करू; अन्यथा उद्या सकाळी या प्रकरणाची सुनावणी केली जाईल. न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत राजपाल यांनी रक्कम जमा केली आणि त्यानंतरच त्यांना जामीन मिळाला. त्यामुळे आता अभिनेता घरातील कार्यक्रमांना उपस्थित राहू शकतील आणि होळीचा सणही घरी साजरा करू शकतील, हे स्पष्ट झाले आहे.
अहवालानुसार, राजपाल यादव यांच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले की अभिनेता कोणत्याही अटींशिवाय एफडीआरद्वारे १.५ कोटी रुपये जमा करण्यास तयार आहेत. यावर न्यायमूर्ती स्वर्ण कांता शर्मा यांनी स्पष्ट केले, “तुम्हाला आधीच माहिती आहे — ही रक्कम डिमांड ड्राफ्ट (DD) स्वरूपात असावी.” न्यायालयाने पुढे नोंद केली की २५ लाख रुपयांचा डिमांड ड्राफ्ट आधीच प्रतिवादींच्या नावावर आहे आणि ७५ लाख रुपयांचा अतिरिक्त डिमांड ड्राफ्टही यापूर्वी जमा करण्यात आला आहे.
—————
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode
