क्रिकेटचा सुपरस्टार विराट कोहली आणि बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा हे दोघं केवळ त्यांच्या कारकिर्दीमुळेच नाही तर अध्यात्मिक जीवनशैलीमुळेही चर्चेत आहेत. अलीकडेच या दोघांनी अयोध्येला भेट देत हनुमान गढी आणि राम मंदिरात दर्शन घेतलं. अध्यात्माकडे झुकलेले हे जोडपं अनेकदा विविध धार्मिक स्थळांना भेट देताना दिसतं. त्यांच्या श्रद्धा, भक्ती आणि साधेपणाचं लोकांमध्ये विशेष कौतुक केलं जात आहे.
BulletsIn
-
अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटपटू विराट कोहली यांनी अलीकडे अयोध्येला भेट दिली.
-
त्यांनी हनुमान गढी मंदिरात दर्शन घेतले आणि प्रार्थना केली.
-
दोघांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
-
अनुष्का शर्मा गुलाबी ड्रेसमध्ये आणि डोक्यावर ओढणी घेऊन बजरंगबलीचं दर्शन घेताना दिसली.
-
विराट कोहली पांढऱ्या पारंपरिक पोशाखात भक्तीमध्ये रमलेला दिसला.
-
मंदिर प्रशासनाकडून दोघांच्याही गळ्यात पुष्पहार घालण्यात आला.
-
दोघांनी हनुमान गढी मंदिरात सुमारे २० मिनिटं पूजाअर्चा केली.
-
त्यानंतर राम मंदिरात जाऊन रामलल्लाचं दर्शन घेतलं आणि अर्धा तास तिथे थांबले.
-
त्यांच्या दर्शनासाठी मंदिराबाहेर चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती.
-
काही दिवसांपूर्वी विराटने टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर, तो अनुष्कासोबत वृंदावनमध्ये प्रेमानंद महाराजांच्या आश्रमातही गेला होता.
